दौंड:-आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:- विजय चव्हाण
गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पुनर्वसन जमीन घोटाळ्याचा चौकशी शुभारंभ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातून या बाबतच्या हालचाली सुरू झाल्या असून मार्च अखेर चौकशीचा फेरा दौंड तालुक्याच्या पुनर्वसन घोटाळ्या पर्यंत पोहचणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.
दौंड तालुक्यात पुनर्वसनाच्या मूळ खातेदारांना लुबडण्याचा प्रयत्न केलेला आहे.यात गोरगरीब पुनर्वसन जमिनी धारकांचा आर्थिक मानसिक छळ केला गेला आहे.या सर्व प्रकाराला दलाल आणि त्यांच्या टोळींचे कटकारस्थान झालेले आहे.बऱ्या पैकी याचा तपास महसूल विभागाला २०१३ दरम्यान लागलेला होता.
परिणामी तत्कालिन पुरंदर दौंड प्रांत यांनी बोगस लाभार्थ्यांचा तपास करून जमिनीवरती सरकार असा शेरा दिला होता.या प्रकाराने दलाल हैराण होवून चवताळाले होते.त्यांनी राजकीय आश्रय घेऊन त्या जमिनी सुद्धा विक्री केलेल्या आहेत.सरकार शेरा असलेल्या जमिनी सध्या प्रशासनाकडे शिल्लक आहेत की नाही हा संशोधनाचा विषय असला तरी बोगस खातेदार आणि दलाल यांच्या भानगडीत जमिनी गायब झाल्या आहेत.
हे मात्र नक्की दौंड शहरातील आणि खेटून असलेल्या गोपाळवाडी सोनवडी दौंड पाटस रोड लिंगाळी खोरवडी परिसरातील महत्वाच्या जमिनीवरती बोगस खातेदार उभे करून लाटण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात झालेला आहे.हा प्रकार परिसरातील स्टॅम्प विक्रेता,पुणे शहरात राहणारा दलाल आणि या दोघांना पाठबळ देणारा राजकीय आका सह त्यांच्या टीमने मोठे योगदान दिलेले आहे.
यांच्या योगदानाने अनेक गरीब लाभार्थी बळी ठरले असून अनेकांच्या घरात आर्थिक मानसिक त्रास झालेला आहे.पैकी अनेक या टोळीला लाखोली वाहून शिव्या श्राप देत आहेत.
पुण्यातील दलाल या कामी अग्रभागी असून त्याने तालुक्यात मोठा धुमाकूळ घातलेला आहे.त्याच्या सेवेसाठी स्टॅम्प विक्रेत्याने केबिन बनून वातानुकल सेवा दिलेली आहे अशी तक्रार शहरात त्यांच्या त्रासापासून वैतागले नागरिक करू लागले आहेत.या दोघांच्या आडून शहरात बांधकाम ठेकदरा सह प्रसिद्ध राजकारणी त्यांचा मुलगा आणि त्यांच्या मर्जीतील टोळी यांनी मोठ्या प्रमाणात माया जमवलेली आहे.
गोपाळवाडी लिंगाळी सोनवडी परिसरात अशा जमिनी पोल्टिंग करून विकण्याचा गोरख धंदा यातून केला गेलेला असून याचा फायदा एका स्टँप विक्रेत्यांनी उचलून आर्थिक गब्बर बनला आहे अशी ओरड शहरात आणि परिसरात राजरोसपणे सुरू आहे.
दौंड तालुक्यात अशा दलाला साठी यवत,पिंपळगाव,दापोडी कानगाव,बोरीपारधी,केडगाव, वाखारी पिंपळगाव राहू परिसरात मोठा बोलबाला असून अनेकांनी एवढ्याच विषयाचा व्यवसाय करून मोठी माय जमवलेली आहे.
वरवंड गावात आणि नानगाव मध्ये राजकीय मान्यवरांनी पोळी भाजून घेतलेली असून त्यांच्या कडून गरीब खातेदारांना मोठा त्रास झालेला आहे.हे दोघे राजकीय वजन सरकारी अधिकाऱ्यांवर वापरून अशा जमिनींची चाटूगिरि करीत असून यांच्या ही पुढे यवत येथील एक राजकीय आशीर्वादाने मदन मस्त झालेला कार्यकर्त्याने अशी अनेक प्रकरणे केलेली आहेत.या सर्व भांगडीसाठी तालुक्यातील राजकीय मान्यवर पडद्याआडून मदत करीत आहेत अशी दबक्या आवाजात तालुक्यात चर्चा आहे.
दौंड तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या दलांनी हवेलीतील उरुळी कांचन मध्ये सुद्धा बोगस कागदपत्रांच्या आधारे जमीन मिळवलेली असून ती एका मोठ्या नेत्यासाठी केलेली कामगिरी आहे अशी वादळी चर्चा आहे.खऱ्या अर्थाने पुनर्वसन नेते दलाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आर्थिक लाभाचे केंद्र बनेल आहे की काय ?अशी शंका या सर्वप्रकरणाची सखोल माहिती घेतल्याने निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही.
आवाज लोकशाहीचा मधून या प्रकरणाची पोल-खोल करण्यासाठी सलग २५ दिवस लिखाण केल्याने सरकारी बाबू जागे झाले आहेत.परिणामी मार्च नंतर यावर गंभीर पाऊले उचलली जाणार आहेत अशी माहीत सुत्रांनी दिलेले असल्याने गुढी पाडव्याचे शुभ मुहूर्तावर पुनर्वसन दलाल आणि त्यांच्या टोळीने आज प्रयत्न पुनर्वसन जमिनीबाबत केलेल्या घोटाळ्याचे प्रकरण उघड होवून आगमींकाळ त्यांच्या साठी वाईट येतोय की काय अशी शंका या निमित्ताने येणे साहजिकच आहे.
> *महत्वाचे वाचा !*
राजकीय आशीर्वादाने आता प्रयत्न पुनर्वसन जमिनींच्या बाबत हेराफेरी करणाऱ्या दलाल आणि त्यांच्या टोळीला कोणाचा त्रास झालेला नाही आणिन्य पुढे ही आशीर्वाद असलेला राजकारणी या साठी आपली ताकद वापरणारा आहे.असा समज या भानगडी करणाऱ्यांचा झालेला असल्याने मार्च नंतर काय कधीच आमच्यावर कारवाई होऊ शकत नाही अशी राजरोस पने चर्चा टोळी करू लागलेली आहे.
ही चर्चा वादळापूर्वीची असून त्यांच्यासाठी प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून पावलो उचललेली आहे आणि याचा विपरीत परिणाम हा त्यांना लवकरच दिसेल अशा स्वरूपाची माहिती सुद्धा सूत्रांकडून समजल्याने आगामी काळात दौंड तालुक्यामध्ये पुनर्वसन जमिनीच्या संदर्भामध्ये मोठा भूकंप होणार की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे.



