देऊळगाव गाडा गाव तसं लोकवस्तीचे लहान, कारभार मात्र झालाय महान, परमिट रूम,तमाशा थिएटर,आणि मुरूम दगडांची बेकायदा खान?

आवाज लोकशाहीचा

विशेष प्रतिनिधी विजय चव्हाण

देऊळगाव गाडा गावात पिण्याच्यापांची समस्या अनेक पिढ्यांचे दुखणे असताना सध्या गावात सहा परमिट रूम बियर बार आणि तमाशा थिएटर झाला आहे .मुरूम चोरट्यांनि गावाची बदनामी केली असून तालुक्याच्या गावी त्याची नोंद घेतली गेली आहे

गावच्या सामाजिक विकासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलून गावच्या नागरिकांना भावी पिढीला सध्याच्या तरुणाईला वाम  मार्गाला जाणाऱ्या गोष्टींच्या निर्मितीला महत्व दिलेले आहे अशी सदय परिस्थिती असल्याने गावकारभारी नक्की काय करतात हा प्रश्न मोठा गहण बनला आहे .

सुमारे ४००० हजार लोकसंखेच्या गावाचा कारभार पाहता गाव तसं चांगलं पण चुकीच्या कारभाराने वेशील टांगला अस म्हणण्याची वेळ आली आहे .देऊळगाव गाडा गाव तसं लोकवस्तीचे लहान, कारभार मात्र झालाय महान, परमिट रूम,तमाशा थिएटर,आणि मुरूम दगडांची बेकायदा खान?

गावच्या मानाने राजकारण मोठे झाले असून गावातील माणुसकीला दगडखान मध्ये दगडांच्या निघणाऱ्या भुग्या सारखी अवस्था करून ठेवलेली आहे .

राजकीय आशीर्वादाने गावभर मुरूम तस्करांच्या चोरट्या धंद्याचे पडसाद उमटून गावची बदनामी सुरू आहे मुरूम चोरटे रात्रभर चोरटा व्यवसाय करीत असून दिवसा गावच्या विकासाच्या गप्पा करताना दिसत आहेत .

छोट्याश्या गावाला अनेक वर्षापासून पिण्याच्या तहान भागवताना नाकी नऊ आले आहे वरवंड येथील व्हिकोटेरिया तलावातील पाण्यावर तहान भागवण्यासाठी असलेली नळपाणी पुरवठा योजना भ्रष्ट कारभारत सापडल्याने योजना मधूनमधून बंद पडत आहे .अशा गावात मात्र सहा शासन मान्यता परमिट रूम बियर बार उभारलेले आहेत .यांना परवानगी देण्याची किमया ग्रामपंचायतीच्या नाहरकत दाखल्याने घडलेली आहे .

जिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अजून शाश्वत नाही त्या गावकऱ्यांना दारू मिळणारी व्यवस्था मात्र शाश्वत करून ठेवलेली आहे .गावच्या कारभाऱ्यांचे ही गावासाठी अत्यंत महत्वाचे आणि मौलिक का म्हणावे लागेल.

याच गावाने परमिट रूम बियर बार च्या नशेत जिंकणाऱ्यांसाठी घुंगरावर नाचणाऱ्या तमाशा थेटर ला सुद्धा परवानगी दिलेली असून या ठिकाणी मध्य धुंद अवस्थेतील तारुण्यात असणारी म्हातारपणा चळ आलेली माणसं घुंगराच्या तालावरती नाचूशकतील  अशी व्यवस्था  या निमित्ताने उभारण्यासाठी प्रामाणिक.प्रयत्न केलेला आहे .

गाव आणि लोकसंखेकडे बारकाईने पाहता गावावर सामाजिक कामांचा वणवा असताना दारू नाचगाणे आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या यंत्रणा उभारण्यासाठी ग्रामपंचायतीचे मोठे योगदान म्हणावे लागेल