विजय चव्हाण
आवाज लोकशाहीचासाठी
दौंड:-
पाटस येथे दौंड महसूल विभाग व कृषी विभाग यांच्या वतीने ॲग्रीस्टॅक योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र तयार करण्याकरिता कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले असताना ८० शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे..
पाटस येथे शुक्रवार दि ७ रोजी दौंड उपविभागीय अधिकारी मीनाज मुल्ला व दौंड तहसीलदार अरुण शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी ओळखपत्र काढून देण्याचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता
या कॅप साठी घंटागाडी मार्फत व्यापक स्वरूपात प्रसिद्धी देण्यात आली होती.या कॅम्पला उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले व शेतकरी बांधवां सोबत संवाद साधला.
शुक्रवार दि ७ रोजी सुमारे ८० शेतकरी बांधवांनी नोंदणी करून घेतली.कॅम्पच्या आयोजना मुळे शेतकऱ्यांनी महसूल विभाग व कृषी विभागाचे अभिनंदन व्यक्त केले आहे.



