यवत आवाज लोकशाहीचा ……
अज्ञातांनी हल्ला केल्याने एक जनाचा जागेच मृत्यू एक जण गंभीर दोघजणांना मारहाण झाल्याचा प्रकार यवत स्टेशन परिसरातील शशिकांत चव्हाण यांच्या शेतातील घरात घडलेला आहे.
बुधवार दिनांक ५मार्च रोजी सायंकाळी साधारण साडे दहा ते अकराच्या दरम्यान हा प्रकार घडला असून विश्वजीत शशिकांत चव्हाण वय वर्ष ३४ याचा डोक्यावर अवजड वस्तूचा प्रहार केल्याने जागीच मृत्यू झालेला आहे ,वडील शशिकांत पांडुरंग चव्हाण आई उज्वला शशिकांत चव्हाण, बहीण प्राची वैभव यादव, यांनाही मारहाण झाली असून आई उज्वला आणि बहीण प्राची यांना लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलेला आहे यामध्ये उज्वला यांची प्रकृती चिंताजनक आहे .
बायको आणि तीन वर्षाचा मुलगा प्रसंगावधानाने बाथरूम मध्ये लपल्याने वाचले आहे.
हा प्रकार अत्यंत गंभीर झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे या पाठीमागे चोरीचा उद्देश की अन्य काही प्रकार हा शंकेचा विषय निर्माण झाल्याने याचा तपास युद्ध पातळीवरती यवत पोलीस अधिकारी नारायण देशमुख आणि त्यांची टीम करीत आहे .या बाबत देशमुख यांनी दिलेले माहिती अशी की बुधवारी रात्री साडेसहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास मृत व्यक्ती चव्हाण यांच्या शेतात असलेल्या राहत्या घरी कुत्र्यांच्या भुकण्याच जोरात आवाज येत होता .हा प्रकार त्यांनी प्रथम घराच्या गच्चीवरून पाहिला मात्र त्यांना दिसून आले नाही त्यांनी घराचा दरवाजा उघडून भोवताली पाहण्याचा प्रयत्न केला असता अंधारात लपून बसलेल्या अज्ञात तीन लोकांनी अवजड वस्तूच्या सहाय्याने त्यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केल्याने ते जागीच कोसळले ,
त्यांच्याबरोबर बाहेर आलेल्या त्यांच्या पत्नीने हा प्रकार पाहिल्यावरती त्या पळत जाऊन घरातल्या बेडरूमच्या शौचालयाच्या आत लपून बसल्या मात्र दरवाजा बंद करण्याच्या विसरून गेल्याने घरात झोपलेली.सासू उज्वला आणि नंनद प्राची यांच्यावर सुधा या अज्ञातांनी हातातील वस्तूंचा प्रहार केला .
मारेकरी एवढ्यावर शांत राहिले नसून घराच्या गच्चीवर झोपलेले सासरे यांच्या कडे गेले त्यांना सुद्धा त्याच पध्दतीने मारहाणा केली आहे .
चव्हाण यांचे राहते ठिकाण शेतात आडबाजूला असल्याने त्यांना अन्य शेजाऱ्यांची मदत मिळालेली नाही मात्र पोलिस स्टेशन मध्ये प्रकाराची खबर मिळताच काही वेळातच घटनास्थळी नारायण देशमुख आणि त्यांची टीम पोहचली अशी माहिती त्यांनी दिलेली आहे .
हा सर्व प्रकार चोरी करणेसाठी झालेला आहे की वादावादीतून झालेला आहे याचा तपास पुढे सुरू आहे उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते



