दौंड:आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी- (विशेष भाग ४) विजय चव्हाण
दौंड पुनर्वसन जमिनीचा मलिदा खाऊन काही दलालांच्या मदतीने आर्थिक फायदा घेतलेल्या बोगस खातेदारांना त्यांना मदत करण्यात आलेला दलाल आणि त्यांच्या टोळीला आवाज लोकशाहीचा मधील पुनर्वसन जमीन घोटाळा प्रकरणाची बाधा झालेली आहे तर काहीणा मनस्तापच झालेला नसून भानगडीत आपला पाय अडकण्याची भीतीने जुलाब लागले आहेत काही सद्या गॅस वर असून काही कावरे बावरे झालेला आहेत.
आपल्या कळ्या कारभाराची पायली भरली की काय? या भीतीने या पैकी काही दलाल आणि बोगस खातेदारांनी पुणे शहराचा पश्चिम पट्ट्यात भानगडी च्या विषया वरती गरमा गरम चर्चा थंड असलेल्या लवासा या ठिकाणी बैठक सुद्धा घेतली आहे.
दलालांच्या या सर्व भानगडींना आशीर्वाद देणारा आका काही जमिनी इतरांच्या नावावर घेऊन बसल्याने त्याच्याही बुडाला आग लागली असून यांना दाखवावे कसे म्हणून बळच दात काढीत दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे.सरकारची ही अनाथायी स्वरूपाची लूट खऱ्या अर्थाने या सर्व भामट्यां कडून ताब्यात घेऊन यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशा स्वरूपाची मोठी मागणी होत आहे.
दौंड तालुक्यामध्ये बोगस कागदपत्राच्या आधारे प्रचंड मोठ्या प्रमाणात जमिनी कमवणारे हे लुटारो जेलमध्ये गेले पाहिजेत अशा अपेक्षा नागरीजन व्यक्त करीत आहेत.
पारगाव गावामध्ये बबन कोंडीबा बावधने,दगडाबाई दगडू दोन्हे,भिकाबाई बाबू कडू
बारकू विठू शेडगे बाळू रामा परीट तुकाराम धोंडू परीट नारायण विठोबा परीट दत्तात्रेय तुकाराम साबळे गिताबाई तुकाराम साबळे अनंता सोमाजी वरघडे शोभा राजाराम साबळे सुनंदा तुकाराम देवघे छाया रोहिदास जगताप बाळू रामा भरेकर महादू रंग कडू हरेश्वर धोंडीबा जगदाळे सुभाष वाघोजी निढाळकर कमल प्रकाश पालकर कैलास बाबुराव भरेकर गुणाजी दगडू पंडित गेणू भिवा दळवी ताराबाई अनंता कडू वच्छला उत्तम कडू रमेश वसंत थोपटे.
शिरापूर मध्ये तुळसा रंगू मरगळे रामभाऊ मुल्ला जी मरगळे गणपत हरी पासलकर दत्तात्रेय भागू पासलकर मारुती गोविंद नाक्ते जनाबाई नथू निवंगुणे दिलीप नथू पासलकर भिका दौलती पासलकर मुक्ताबाई भिका पासलकर लक्ष्मण ओसा शेडगे महादू सदाशिव रामचंद्र साधू यादव लक्ष्मण शेडगे लक्ष्मीबाई वाघू पवार भागू वाघू पवार विष्णू कृष्णा मारणे नारायण कृष्णा मारणे सुशील हनमघर शंकर मारुती मोरे भाऊ रामा मरगडे नकुबाई बाबू मरगळे हरी पासलकर वाघू दगडू पासलकर दत्तात्रेय किसन नाक्सी ज्ञानेश्वर धोंडीबा दबडे मंगल ज्ञानेश्वर दबडे दगडाबाई विठ्ठल पडवळ बाळाबाई गेनू भऊ पडवळ सुंदराबाई राघू कडू नारायण राघू कोळेकर यांनी मिळवलेल्या जमिनी बाबत मोठे गोड बंगाल असून याची यादी दौंड महसूल प्रशासनाने तयार केलेली आहे काही यातील जमिनी सरकार जमा असा शिरा दिला असला तरी तिचे संबंधित खातेदारांनी खरेदी विक्रीचे व्यवहार सुद्धा केलेली आहेत.
सरकारची जमीन बोगस कागदपत्रांच्या आधारे मिळवायची आणि ती विकायची आणि त्यातून आर्थिक लाभ घ्यायचा असा या लुटारूंचा धंदा असून यांची सखोल चौकशी करा अशी मागणी होऊ लागली आहे.
दौंड शहरालगतच्या बोगस जमिनीमध्ये गोपाळवाडी परिसरातील सहभागी होता गोर गरिबांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेतल्याने त्याची कुटुंब उध्वस्त झालेले आहे.
आई भाऊ देवा घरी गेले असून स्वतःची ही अवस्था आरोग्य दृष्टीने सध्या बेकार आहे रुग्णालयाशी त्याचे नाते सध्या घट्ट झाला असून कोणत्या क्षणी त्याला कुठला त्रास होईल हे सांगता येत नाही अशी परिस्थिती असताना सुद्धा जमीन मिळवण्याचा मोह त्याला आवरता आलेला नाही.
सध्या या व्यक्तीकडे पुनर्वसन च्या मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत अशा स्वरूपाचा बोलबाला दौंड परिसरामध्ये असून तो शहरातील अशा जमिनी लुटणाऱ्याच्या टोळीतील एक सहकारीच आहे असे सुद्धा राजरोसपणे बोलले जात आहे.
आवाज लोकशाहीच्या माध्यमातून या सर्व त्याच्या भानगडी लवकरच प्रकाशित करण्याचा मानस असून त्याची माहिती लवकरच हाती येणार आहे.
गोरगरिबांच्या जमिनीच्या तळतळाटाने आर्थिक स्रोत वाढू शकतो मात्र जगण्याचा आनंद हा राहत नाही तो आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरतो याचे हे मूर्तीमंत उदाहरण म्हणता येईल अशा स्वरूपाचे शहरा लगतचे जमिनीच्या बाबत कामकाज करणारे या टोळीतील सर्व पीडित होतीलच असा श्राप सुद्धा नागरिक बोलताना या टोळीला देऊ लागले आहेत.



