दौंड:आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी- विठ्ठल होले
दौंड पासलकर वस्ती परिसरात कर्ण कर्कश आवाज वाढवून शांतता भंग करणाऱ्या डीजे वर कारवाई करण्यात आली आहे.पोलीस कॉन्स्टेबल महादेव जाधव यांच्या सरकारी फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना पोलीस निरीक्षक गोपाळराव पवार यांनी डीजे मालकांना सूचना वजा इशारा दिला आहे.की कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आवाजाची आणि वेळेची मर्यादा न पाळणाऱ्या डीजे वर कारवाई करण्यात येईल.डीजे सुरू असलेल्या परिसरातील नागरिकांच्या तक्रारी आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
असे सांगितले आहे.रात्री साडे दहा च्या 10 वाजता ११२ या नंबरवर फोन करून पासलकरवस्ती लिंगाळी येथे मोठमोठ्याने डि.जे वाजत आहे.
त्याचा लोकांना त्रास होत आहे, सदरची माहिती पोलिस निरीक्षक गोपाळराव पवार यांना दिली असताना त्यांनी सदर ठिकाणी डिजे. ताब्यात घेवुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करा असे सांगीतल्या नंतर पो.हवा.विठठूल गायकवाड,पो.ना.बापु रोटे,पो. कॉ. निलेश चव्हाण,महादेव जाधव,चालक पो हवा सुधाकर जाधव अशी तीन पासलकरवस्ती, लिंगाळी या १०.३० वाजता च्यासुमारास सदर परिसरात पोहचले तेव्हा तेथे विठठ्ठल मंदीराचे पुर्वेस रोडवर जमीनीवर ४ मोठे डि. जे. चे बॉक्स ठेवलेले होते.व त्या शेजारी एक मशीन दिसत होती.सदर ठिकाण एक इसम डिजे मशीन चालवित होता.त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव देविदास सुखदेव चव्हाण वय २३ वर्षे रा. इंदिरानगर, गांधी चौक, दौंड ता. दौंड जि. पुणे असे असल्याचे सांगीतले.सदर परिसरात कोल्हे हॉस्पीटल व न्यायालय असताना त्याकडे दुर्लक्ष करून मोठ्याने आवाज वाढवुन सार्वजनिक शांततेचा भंग करीत असताना तो मिळून आला.पोलिसांनी त्याला साउंड सिस्टीम थांबविण्याच्या सुचना देवुनही त्याने तो तसाच मोठ्या कर्कश आवाजात डिजे चालु ठेवला.त्याने मा. जिल्हाधिकारी,पुणे यांचेकडील आदेश क. पगक/कावि/५८/२०२५ दिनांक २२/०२/२०२५ रोजी ००:०५ वाजता पासुन ते दिनांक ०७/०३/२०२५ रोजी १२ :०० वा. पर्यंत जारी करण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. म्हणुन माझी देविदास सुखदेव चव्हाण वय २३ वर्षे रा. इंदिरानगर, गांधी चौक, दौंड ता. दौंड जि. पुणे याचेविरुद्ध भारतीय न्यायसंहीता कायदा कलम २९२, २९३, २२३ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.पोलिसांनी डी जे सर्व साहित्य जप्त केले आहे.



