कृषी महाविद्यालय पुणे येथील कृषीकन्यांकडून  बोरीपार्धीत शेतकयांसाठी प्रात्यक्षिक

केडगाव …आवाज लोकशाहीचा ……


बोरी पार्धी येथे कृषी महाविद्यालय, पुणे येथील कृषीकंन्या ग्रामीण कृषी जागरुकता आणि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कार्यक्रम.घेण्यात आला यावेळी

आधुनिकीकरण युगात शेतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड मिळावी संगणक  युगात संगणकातून शेतीची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे

सध्याच्या डिजिटल युगात भारताचा कणा समजला जाणारा जगाचा पोशिंदा आपला शेतकरी मागे राहू नये या हेतूने कृषी कन्यांनी विविध मोबाईल एप्लीकेशन प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना माहिती दिली.

यामध्ये पिकाची नोंदणी सातबऱ्यावर करण्यासाठी ‘इ-पीक पाहणी शेतीतील व्यापारासंदर्भात ‘फारर्मस ई मार्केट’ पशुधनासंदर्भात ई-गोपाला आणि हवामान अंदाज यासाठी दामिणी, आणि विविध पिकांसाठी ‘ग्रेपमास्टर याबाबत शेतकयांना माहिती दिली

यावेळी कृषिकंन्या अदिती साळुंखे, एकता देशमुख, साक्षी काळे, प्रणाली जगताप, साक्षी कड, सायली अरगडे, धनश्री वाघमोडे, अंकिता शेलकंदे, सलोनी ठाकूर उपस्थित होत्या

या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, केंद्र समन्वयक डॉ विजय तरडे, केंद्र प्रमुख डॉ स्वाती खांडवे आणि कार्यक्रम अधिकारी डॉ दिप्ती वाघधरे यांचे मार्शदर्शन कृषिकन्यांना लाभले.