यवत:आवाज लोकशाहीचा
यवत रुग्णालयात डायलिसिस सेवा सुरू झालेली आहे.ग्रामीण भागात पहिलीच अशा स्वरूपाची सेवा मुक्त असून हा मान यवत ग्रामीण रुग्णालयाला मिळालेला आहे.
डिसेंबर महिन्यात ही सेवा सुरू झाल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक किशोर पत्की यांनी दिलेली आहे.
किडनी फेल असलेल्या रुग्णांना ही सुविधा अत्यंत महत्वाची असून डॉक्टरांच्या सल्याने अश्या रुग्णांना आठवड्यात रुग्णांच्या आजार प्रमाणे एक अथवा दोन दिवस करावी लागते ही सेवा खाजगी रुग्णालयात अशा गरीब गरजू रुग्णांना आर्थिक अडचणीमुळे परवडत नाही त्यांच्यासाठी हि संजीवनी म्हणता येणार आहे.
दौंड तालुक्यात ही सेवा खाजगी दोन ते तीन ठिकाणी असून त्यांच्याकडे एवढी सोय नाही या ठिकाणी चार मशीन अत्याधुनिक असल्याने ऐका वेळेस चार रुग्णांना ते सेवा देऊ शकतात खासगीत अशी सोय नाही ऐका वेळेस चार रुग्णांना देणारी अशी महत्वपूर्ण सेवेचे ग्रामीण रुग्णालय ग्रामीण मधे पहिली च आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.
यवत ग्रामीण रुग्णालयात या ठिकाणी सेवा देणारी टीम सुधा पूर्ण माहितगार आहे.विशेष म्हणजे गावाकडील गरीब रुग्णासाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.गरजू रुग्णांना याचा लाभ देणारे यवत ग्रामीण रुग्णालय ग्रामीण भागात पहिलेच असल्याने याचा लाभ दौंड तालुक्यासह गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन अधीक्षक किशोर पत्की यांनी डिजिटल आवाज लोकशाहीचा ला बोलताना केले आहे.



