वरवंड येथे सडक सुरक्षा अभियान संपन्न,- ए सी दिवेकर महाविद्यालयाचा सहभाग

वरवंड(वा):-महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२५महामार्ग पोलीस यांच्या वतीने “सडक सुरक्षा जीवन रक्षा” या अभियानार्तगत वरवंड येथील एकनाथ सिताराम दिवेकर फार्मसी कॉलेज,व महामार्ग पोलीस बारामती फाटा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच सडक सुरक्षा जीवनरक्षा अभियानार्तगत फार्मसी विद्यार्थ्यांच्या वतीने जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात फार्मसी कॉलेज पासून ते वरवंड,येथील शिवाजी महाराज चौकापर्यंत प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी वाहतूक सुरक्षा जीवन रक्षा, वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा,अशा विविध प्रकारच्या घोषवाक्यातून विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी व पथ नाट्याच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.या कार्य- क्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
दिवसेंदिवस महामार्गावर होणारे अपघात हे प्रखर,किंवा बंद दिवे असलेल्या वाहनांमुळे घडत असतात.महामार्गावरील ही वाहने लगेच दिसावी व होणारे अपघात टाळण्यासाठी फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ऊस वाहतूक तसेच इतर वाहनांना परावर्तक लावले.या अभियानात वरवंड ग्राम शिक्षण संस्थेचे विश्वस्त डॉ.विजयकुमार दिवेकर,फार्मसी कॉलेजच्या प्राचार्या डॉ.अमिता डोंगरे यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी महामार्ग पोलीस उपनिरीक्षक अशोक सोडगीर,प्रभारी उपनिरीक्षक श्रीहरी पानसरे,पोलीस हवालदार दीपक कुमार वाईकर,रामदास चौधरी,सागर आटोळे,सचिन चव्हाण,अनिल मोरे,यांचे सहकार्य मिळाले. फार्मसी कॉलेजच्या प्राध्यापक श्वेता भालेराव व पूजा नाफडे,प्राध्यापक ममता दिवेकर पुनम थोरात तनुजा पानसकर व इतर प्राध्यापक यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमादरम्यान फार्मसी कॉलेजच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.