बेशिस्त वाहनांवर कारवाई कधी पोलीस वाहतूक विभाग असतो कुठे

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई कधी
पुणे सोलापूर रोडवर वाढते अपघात, वाहतूककोंडीत वाढ बेशिस्तपणामुळे होतेय कोंडी वाहतूक विभाग करतोय काय?

पाटस : -दौंड दौंड तालुक्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये निवडणुकीचा रणधुमाळी चालू असताना सर्व प्रशासन या निवडणुकीच्या कामकाजामध्ये व्यस्त असताना या पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अवैधरित्या वाहतूक करणारे व अवैधरित्या वाहन लावणाऱ्या बेशिस्त वाहन चालकावर कारवाई करणार कोण असा प्रश्न सर्वसामान्य पडला आहे,वाहतूक विभाग असताना हा रोजचा प्रकार नागरिकांना आणि प्रवाश्यांना त्रासदायक ठरतो आहे

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौफुला वरवंड पाटस यादरम्यान असणाऱ्या सर्विस रोडवर व चौफुला येथील पुलावर वाहन पार्किंग केली जात आहे याला आळा घालणार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे . वरवंड व चौफुला दरम्यान हॉटेल व्यवसायिक व्यवसायासाठी सर्विस रस्त्याचा वापर केले जात असल्याचे उघड झाले आहे कारण हॉटेलमध्ये येणाऱ्या बसचालकांच्या बेशिस्तपणामुळे पुणे- सोलापूर महामार्गावरील वरवंड व चौफुला दरम्यान असणाऱ्या सर्विस रस्त्यावर हे बस चालक सर्रासपणे बस लावून जेवण व नाश्ता करण्यासाठी जात असतात या बस चालकांना व वाहन चालकांना बस ही रस्त्यावर लावलेले आहे याचे भानही राहत नाही या हॉटेल चालक व बस चालकांवर कारवाई करणार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सर्विस रस्ता हा तर राष्ट्रीय महामार्गालगत लगतच्या गावांसाठी वापरासाठी केलेला असतो मात्र या सर्व रस्त्याचा वापर अशा पद्धतीने केला जात आहे. अशा बसवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच पाटस ते वरवंड, वरवंड ते चौफुला, चौफुला ते वरवंड, वरवंड ते पाटस या ठिकाणी असणाऱ्या सर्विस रोडवर तसेच महामार्गावर वाहने लावणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई होणार का ?
वरवंड पाटस चौफुला यादरम्यान मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले आहे तसेच आठवडे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात तीन चाकी रिक्षा प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त भरले जात असल्याचे उघड झाले आहे. तसेच मजुरांची क्षमतेपेक्षा जास्त गाडीत बसून वाहतूक केली जात आहे याला आळा घालणार कोण या अवैध प्रवासी वाहतूक व अवैध पार्किंग बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वर ठोस कारवाई करणे गरजेचे आहेत यवत पोलीस स्टेशन, बारामती फाटा वाहतूक पोलीस, केडगाव पोलीस चौकी, पाटस पोलीस चौकी यावर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित सर्वसामान्य नागरिक करीत आहेत

रस्त्यावर अवैधरित्या बस लावलेली दिसत आहे,
चौफुला येथें पुलावर रिक्षा उभ्या असतात ही बाब नित्याची झालेली आहे .

चौकट . …पुणे सोलापूर महामार्गावर वाहतूक विभगाची शाखा आहे तसेच यवत पोलिसांनी वाहतूक विभागला काही कर्मचारी नेमलेले आहेत .तरीही हा रहदारीचा रस्ता तसेच केडगाव चौफुला रस्ता कायम बेशिस्त वाहनांना मूळे जाम होतो.ही बाब खेदजनक म्हणावी लागेल