आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी : एम.जी.शेलार
प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या पोलीस जवानांनी पोलीस बलाचे धेय्य व उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन जनतेची कर्तव्य भावना प्रामाणिकपणे आणि इमानदारीने पार पाडावे.असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल,पुणे यांनी नानविज ता.दौंड येथील पोलीस दीक्षांत समारंभ प्रसंगी बोलताना केले आहे.
नानवीज येथील नव प्रविष्ट पोलीस शिपाई प्रशिक्षण सत्र क्रमांक ६७ दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता..
मोराळे आपल्या भाषणात पुढे म्हणाले,बल सागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.हे कंकन करी बांधियले,जणसेवे जीवन दिधले.या पूज्य साने गुरुजींच्या कविते प्रमाने प्रशिक्षण नार्थी यांनी आपला प्रत्येक क्षण व्यतीत करावा.
या कार्यक्रमात दीक्षांत संचलनाच परेड कमांडर म्हणून पोलीस बल क्र. १३ कोल्हापूर विशाल मनोज चौगुले प्रथम क्रमांक,बच मध्ये फस्ट एड मॅच म्हणून शिवम शंकर दिघे प्रथम क्रमांक. बेस्ट फायर म्हणून नितीन नारायण भोये प्रथम क्रमांक. बेस्ट कॅडेट ऑफ द किताब आकाश राठोड प्रथम क्रमांक,रां.रा.बल गोंदिया. यांना उपस्थित मान्यवर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला..
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अशोक मोराळे विशेष पोलीस महानिरीक्षक रा.रा.पो.ब.पुणे,अप्पर पोलीस महासंचालक,रा. रा.पो.ब. महाराष्ट्र राज्य मुंबई चिरंजीव प्रसाद यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण कालावधी मध्ये. पारंपरिक,आधुनिक प्रशिक्षण,भारतीय सैन्य व निमलष्करी दलप्रमाने Bpet व ppet बेसिक कमांडो, गोळीबार, सराव, आधुनिक शस्त्र प्रशिक्षण,विविध कायदे,मानसिक ताणतणाव, व्यक्तिमत्व विकास,लीडर शिप, प्रथमोपचार,Cpr तज्ञ मार्गदर्शन प्रशिक्षण दिले जाते..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रामचंद्र केंडे,आभार उपप्राचार्य बी.पी.जाधव तर सूत्रसंचालन उगमुगले यांनी केले.या कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी,त्यांचे पालक,सर्व अधिकारी,कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
विशेष वाचा
कवायत मैदानावर अखिल भारतीय पोलीस बँडस्पर्धे मध्ये सलग ६ वेळा सुवर्ण पदक प्राप्त केलेल्या “पाइप बँड पथकाचे” लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल प्राचार्य रामचंद्र केंडे यांनी पाइप बँड टिमचे सन्मान चिन्ह देवून गौरव केला.



