आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी :- मनोहर तावरे
मोरगाव प्रतिनिधी :- बारामती तालुक्या मधील अनेक गावात सध्या शेतकरी एका अनोख्या समस्येने त्रस्त
आहेत.शेतीसाठी औषध आणि खतांची विक्री करणाऱ्या दुकान चालकांची येथे मनमानी सुरू असल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे.
युरिया खताची कृत्रिम टंचाई सांगत वाढीव दराने विक्री करण्याचा प्रकार समोर आले आहेत.यासाठी नियंत्रण करणारे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने याची चौकशी व्हावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.
बारामतीच्या काही प्रमुख गावातून औषध खत विक्री दुकानातून शेतकऱ्यांची मोठी लूट होत असल्याचे प्रकार गेल्या अनेक वर्ष सुरू आहेत.
मात्र मोरगाव परिसरात युरिया खतांची विक्री करताना दुकान चालक शेतकऱ्यां कडून निश्चित केलेल्या किमती पेक्षा आगाऊ रक्कम घेत असल्याच्या तक्रारी कायमच होत आहेत.मात्र हे वास्तव कृषी विभाग व पंचायत समिती अधिकाऱ्यांना माहित आहे.परंतु कारवाई का? होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असल्याने प्रशासनावर शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करीत आहे.



