लिंगाळी येथे महिला गृह उद्योग बचत गट व्यवसाय मार्गदर्शन | लिंगाळी ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम |
आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:विठ्ठल होले
लिंगाळी येथे महिला व महिला गृह उद्योग बचत गट व्यवसाय मार्गदर्शन सोमवार दि ६ रोजी करण्यात आले हा उपक्रम लिंगाळी ग्रामपंचायतीचा वतीने करण्यात आला आहे..
लिंगळी (ता.दौंड) ग्रामपंचायत कार्यालय येथे महिला स्वयंसहायता बचत गटाचे अध्यक्ष,सचिव सर्व अंगणवाडी सेविका,आशा सेविका यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या मिटिंग साठी महिला गृह उद्योग,बचत गट व्यवसाय मार्गदर्शन तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी पंचायत समिती दौंड येथील महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे रमेश सले,स्वप्निल सुर्वे,श्रीमती निर्जला गुंड यांनी उपस्थित राहून सर्व महिलांना मार्गदर्शन केले व शासकीय योजनाची माहिती दिली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच सुनील जगदाळे यांनी केले,यावेळी उपसरपंच वैजयंता चितारे,ग्रामपंचायत सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे,ग्रामपंचायत सदस्य संतोष गावडे, वसंत गायकवाड,मोनाली जगताप, ग्रामपंचायत अधिकारी अमीर शेख,पोलीस पाटील अश्विनी बगाडे, निता वाघमारे, सी.आर.पी.रोहिणी साबळे,शिला वाघमारे तसेच गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



