आई बाप समजून घेताना या विषयावर डॉ.वसंत हंकारे यांचा विचार

वरवंड येथे श्री गोपीनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान

डॉ वसंत हांकारे यांच्याकडून आई- बाप समजावून घेताना’विद्यार्थ्यांना भावना अनावर

आवाज लोकशाहीचा
वरवंड:-प्रतिनिधी

तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या महत्वकांक्षा धुळीस मिळवणारा बाप असतो आणि आईच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबराब राबतो तो बाप असतो,तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतः फाटके कपडे घालेल पण तुम्हाला नवीन कपडे देईल तो बाप असतो असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा.डॉ.वसंत हंकारे यांनी वरवंड येथे केले आहे.

वरवंड (ता.दौंड) येथील गोपीनाथ विद्यालयात स्व.लोकनेते नानासाहेब भाऊ फडके ग्राम प्रतिष्ठान यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यासाठी स्वयसिद्ध फाउंडेशन यांनी ही संकल्पना मांडली होती यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘आई बाप समजून घेताना’ या विषयावर हंकारे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते.

ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, प्रेम करुन माती कालवू नका मुलींनो प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकून स्वतःचे आयुष्य बरबाद करु नका. १५ ते २० वर्ष आपल्याला सांभाळलेले असते त्यांच्या अन्नात प्रेम करुन माती कालवू नका.

आपले आई- वडील समाजात ताठ मानेने फिरले पाहिजे,ही मुलगी,हा मुलगा माझा आहे असे कर्तृत्व,तुमचे वागणे,जगणे असले पाहिजे,चुकीच्या वागण्याने आपला बाप अर्धमेला होतो.त्याला समाजात तोंड दाखवायला जागा राहत नाही असे वागू नका.

आई मुलाला किंवा मुलीला नऊ महिने पोटात वाढवते मात्र बाप आयुष्यभर मुलांच्या भवितव्याचा विचार करत असतो.ज्या घराच्या समोर बापाची चप्पल असते ना त्या घराकडे कोणाची वाईट नजर ठेवण्याची ताकद नसते.जोपर्यंत आई बाप जिवंत आहे. तोपर्यंत जीव लावा देवाच्या पायावर लाखो रुपये घातले तरी बाप परत येणार नाही.

छोट्या छोट्या गोष्टींसाठी आई बापाला धमकी देणाऱ्यांनो एकदा अनाथ आश्रमात जाऊन बघा ज्यांना आईबाप नाहीत त्यांच्याकडे पहा एकदा काय परिस्थिती आहे.शिक्षण घ्यायच्या वयात शिक्षण घ्या प्रलोबाला बळी पडू नका.झाल्या चुका सोडून द्या सगळ्या चुका माफ करणारा एकच देव तो म्हणजे बाप होय.या वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाने विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ अनावर झाले त्यांच्या अश्रूचा बांध रोखता आला नाही विद्यार्थी सहित ग्रामस्थ पालक ढसा ढसा रडू लागले.

ग्राम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय दिवेकर, संचालक डॉ. विजय दिवेकर, या कार्यक्रमाचे आयोजक सागर फडके अध्यक्ष दौंड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस, योगेश फडके मा. सरपंच ग्रामपंचायत हातवळण, निलेश सूर्यवंशी उद्योजक,योगिनी दिवेकर महिला अध्यक्ष,श्री गोपीनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक शिक्षक , तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.