दौंड तालुक्यातील आलेगाव क्रिकेट सामने | अलेश्र्वर ग्रामपंचायत चषक नावाने विजेत्या संघास चषक |

आलेगाव मध्ये रंगले अलेश्वर ग्रामपंचायत चषक क्रिकेट सामने..

मोबाईलच्या जमान्यात मैदानी खेळाला तरुणाचा उस्फुर्त प्रतिसाद !

आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:-विठ्ठल होले

दौंड तालुक्यातील आलेगाव येथे अलेश्वर ग्रामपंचायत चषक क्रिकेट सामने खेळले गेले या मध्ये तरुण आणि लहान मुलांचा सहभाग पाहण्यासारखा होता.सध्या मोबाईलचा जमाना आहे लहान थोर,महिला पुरुष सर्वच जण मोबाईल मध्ये दंग झालेले आहेत.परंतू ग्रामीण भागामध्ये मैदानी खेळाला प्राधान्य दिले जाते याचेच उदाहरण आहे..

आलेगाव येथे आलेश्वर ग्रामपंचायत चषक २०२४ पर्व तिसरे अतिशय सुरेख असा उपक्रम क्रिकेटची स्पर्धा घेऊन आलेगाव करांनी दाखवून दिले आहे.

यामध्ये प्रथम पारितोषिक सारंग प्रदीप कदम यांच्या संघाला मिळाले, दुसरे बक्षीस अंबादास निळकंठ काळे यांच्या संघाला मिळाले आणि तिसरे बक्षीस वासुदेव विठ्ठल काळे यांच्या संघाला मिळाले असे बक्षीस क्रमवारीत मिळाली अतिशय रोम हर्षक सामने खेळले गेले होते.

एकाच गावामध्ये सहा संघाद्वारे मॅच खेळण्यात आल्या यामध्ये मॉर्निंग क्रिकेट क्लबचे खेळाडू उत्साहाने सहभागी झाले अंतिम सामन्याचे समालोचन विकास खोसे तर प्रास्ताविक योगेश बोबडे पोलीस पाटील आलेगाव यांनी केले.

यावेळी शिवाजी कदम कृषी अधिकारी आणि नवनाथ कदम यांनी सर्व नवीन खेळाडूंना मार्गदर्शन केले.

पुढील वर्षी अशाच प्रकारे अतिशय सुरेख असाच क्रम चौथ्या पर्व मध्ये ठेवणार आहेत अशी तरुणांनी माहिती दिली आहे.

गावातील सर्व जवळपास शंभर मुलांचा सुंदर असा ग्रुप तयार होणे आणि तो खेळासाठी एकत्र येणे यातून फिटनेस आणि गावाची एकी दिसून येते गावातील जेष्ठ नागरिकांनी सर्व खेळाडू आणि आयोजकांचे अभिनंदन केले आहे.