आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी :- विठ्ठल होले
कूरकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र गोपाळवाडी, गिरीम, सोनवडी व वासुंदे या कार्यक्षेत्रातील संशयित pre sumptive रुग्णाचे क्ष -किरण तपासणी शुक्रवार दि २७ रोजी करण्यात आली असताना या शबिरा मध्ये २२५ लोकांनी तपासणी करून घेतली आहे,
पुणे जिल्हातील ग्रामीण कार्यक्षेत्रातील १०% जोखीम ग्रस्त लोकसंख्या ACF सर्वेक्षण करिता निवड करण्यात आलेली आहे,सदर सर्वेक्षण आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांचे मार्फत घरोघरी भेटी देऊन करणार आहे.
याचा सर्वेक्षण कालावधी सोमवार दि २३ डिसेंबर पासून शुक्रवार दि ३ रोजी या १० दिवसांमध्ये पूर्ण करणार असल्याची माहिती शिबिर व्यक्तींनी दिली आहे..
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ विकास वडगाये,वैद्यकीय अधिकारी डॉ बनसोडे,वैद्यकीय अधिकारी डॉ जितू माळी,भीमराव बडे आरोग्य निरीक्षक, दत्तात्रय पाठक आरोग्य निरीक्षक,कापसे आरोग्य सेवक,आरोग्य निरीक्षक कोळी,CHO खोमणे,MPW कापसे व अनुराग भगत,गट प्रवरतक गवळी ,शितल मॅडम,आरोग्य सेवक रवि पवार, आशा,STS आणि STLS उपस्थित होते..



