कै. एकनाथ सिताराम दिवेकर इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये शालेय अंतर्गत विज्ञान प्रदर्शन

कै. एकनाथ सिताराम दिवेकर इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये शालेय अंतर्गत विज्ञान प्रदर्शन

वरवंड : ता-दौंड कै. एकनाथ सिताराम दिवेकर इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये शालेय अंतर्गत विज्ञान प्रदर्शन
भरवण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग दर्शविला
या विज्ञान प्रदर्शनात 120 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तसेच या प्रदर्शनामध्ये एक एकूण 113 प्रकल्प सादर करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी एकूण ५५ प्रकल्पांचे सादरीकरण केले. यादरम्यान सहाशे विद्यार्थ्यांनी प्रकल्पाचे निरीक्षण केले या प्रदर्शनात विविध प्रकारच्या प्रकल्पांचा समावेश होता. यामध्ये अटल झिरो बजेट वॉटर हीटर, प्रदूषित पाण्याचे शुद्धीकरण, तुषार सिंचन, हवेचा दाब, बल, उष्णता, सोलार वॉटर बॉटल बल्ब, फळ काढणी यंत्र, वॉटर क्लीनर, पवन ऊर्जा, घनता, पर्यावरणातील बदल, सेक्युरिटी अलार्म अशा विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले.

या प्रदर्शनाचे उद्घाटन वरवंड ग्राम शिक्षण संस्थेचे संचालक विजयकुमार दिवेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी प्रदर्शनाला वरवंड ग्राम शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय दिवेकर ,संचालक अंकुश दिवेकर, संचालक डॉ.विजयकुमार दिवेकर, संचालक अॅड. अर्जुन दिवेकर इंग्लिश मिडियमचे प्राचार्य प्रमोद बारवकर ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच श्री गोपीनाथ विद्यालयाचे प्राचार्य अनिल शेलार , उपप्राचार्य वसंत इंगळे उपस्थित होते. या प्रदर्शनामध्ये परीक्षार्थी म्हणून शहाजी कुरुमकर . पोपट गांगर्डे , अजित गोरे , दादा चौधरी यांनी काम पाहिले

फोटो ओळ- वरून ग्राम शिक्षण संस्थेची संचालक अॅड अर्जुन दिवेकर प्रदर्शनाचे पाहणी करताना