सर्व धर्मांचा सन्मान करा..प्राचार्य विशाल जाधव .

पोदार इंटरनॅशनल स्कुल रोहकलं चाकण प्रशालेत ख्रिसमस उत्साहात साजरा,

भारतातील सर्व धर्मांचा आदर करा — प्राचार्य विशाल जाधव

आवाज:लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी :- विठ्ठल होले

भारत देश हा विविधतेने नटलेला असताना अनेक पंथांचे,धर्मांचे लोक गुण्या गोविंदाने आपल्या देशात वास्तव्य करत आहेत ही बाब लक्षात घेता,प्रशालेतील विध्यार्थ्यांना सर्व धर्म सहिष्णूता,धर्म परंपरा यांची ओळख व्हावी हा मानस समोर ठेऊन प्रत्येक सण उत्सव हा प्रशालेत साजरा केला जातो. त्यामुळे नाताळाचे औचित्य पाहता प्रशालेत ख्रिसमस म्हणजेच नाताळ सण उल्हास व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला आहे..

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी
फादर -ओबेदास गायकवाड,आवर लेडी फातिमा चर्च वाकि- चाकण,प्राचार्य विशाल जाधव या मान्यवरांच्या शुभहस्ते प्रभू येशू ख्रिस्त यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते तिसरीच्या विध्यार्थिनींनी कॅरोल्स गायन करून प्रभू येशू ख्रिस्त यांना मानवंदना दिली तसेच इयत्ता पाचवी ते सहावी च्या विध्यार्थ्यांनी नृत्य व ख्रिस्त जन्म दर्शवणारी नाटीका सादर केली व विध्यार्थी, शिक्षक यांनी मनोगत व्यक्त केले तसेच या मंगलमय दिनानिमित्त प्रशालेत साकरलेला येशू ख्रिस्त जन्माचा देखावा खास आकर्षण ठरला.तर कार्यक्रमात पहिली ते दहावी च्या तब्बल एक हजार विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे यांनी नाताळ का साजरा करावा व ख्रिस्त जन्माची महती विषद केली व उपस्थित सर्वांना नाताळ व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी प्राचार्य विशाल जाधव यांनी विध्यार्थ्यांना सर्वधर्म समभाव आता पासूनच आत्मसात करून प्रत्येक पंथाच्या,धर्माच्या धर्म परंपरेचा आदर सन्मान करावा व प्रत्येकाने आपल्या संस्कृती चे जतन करावे असे प्रतिपादन केले व उपस्थित सर्वांना नववर्ष व नाताळ च्या शुभेच्छा दिल्या आहे..

या कार्यक्रमाचे आयोजन,शालेय सांस्कृतिक विभागाने केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवी चे विध्यार्थी अंश साळुंखे, अक्षत घोळवे यांनी केले व आभार शिक्षिका धनश्री पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी शिक्षक विध्यार्थी,पालक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.