जनहित फाउंडेशनच्या वतीने यंदा शिवजयंती महोत्सवानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आवाज लोकशाहीचा
वृत्त : विजय चव्हाण
जनहित फाउंडेशनच्या वतीने यंदा शिवजयंती महोत्सवानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कुसेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात अटल व्याख्यानमाला व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक चेअरमन मनोज वसंतराव फरतडे यांनी दिली आहे.
या महोत्सवाचा मुख्य सोहळा ६ मे रोजी पार पडणार असून उद्घाटन प्रसंगी तात्या महाराज ढमाले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार रमेश किसनराव थोरात यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य वीरधवल बाबा जगदाळे राहणार आहेत.
या प्रसंगी शिवसंग्राम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव साळुंखे, भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन सत्वशील भाऊ शितोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यात शिवाजीराव संपतराव ढमाले, प्रदीप किसनराव दिवेकर, धनंजय शहाजी शेळके, बाळासाहेब पुसद, संजय संपत भोसले, तसेच जिल्हा परिषद सदस्य वीरधवल कृष्णराव जगदाळे, तुषार रमेश थोरात, सागर रघुनाथ शेलार आणि साहेबराव राजाराम पोळ यांचा समावेश आहे.
याच कार्यक्रमात “छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार २०२६” अंतर्गत जीवनगौरव सन्मान माजी आमदार रमेश किसनराव थोरात यांना प्रदान करण्यात येणार आहे.
महोत्सवानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लोकनेते अजितदादा पवार आरोग्य सेवा व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिराचे उद्घाटन स्वप्निल भैय्या शहा (अध्यक्ष, गजानन महाराज मंदिर ट्रस्ट, दौंड) यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विक्रांत भैय्या गायकवाड उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवाच्या अंतिम दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून “खेळ पैठणीचा – सन्मान महिलेचा” हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ वैशालीताई नागवडे (प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश) यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अनुराधाताई सत्वशील शितोळे राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सारिकाताई पानसरे, मंदाकिनीताई चव्हाण, आशाताई नितीन शितोळे, ज्योतीताई झुरंगे, इंदुमतीताई महादेव शितोळे, तृप्तीताई दादा भंडलकर, अवंतिकाताई अभिजीत शितोळे आणि ज्योतीताई शिवाजी ढमाले या मान्यवर महिलांची उपस्थिती राहणार आहे.
यावेळी सत्कारमूर्ती म्हणून नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे, पंचायत समिती सदस्य मनीषा संतोष ताकवणे, जिल्हा परिषद सदस्या  डॉ गायत्रीताई विशाल खळदकर, अनुराधाताई सत्वशील शितोळे आणि प्रणिता अक्षय जठार या महिलांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
एकूणच शिवजयंती महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विविध कार्यक्रमांमुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण होणार असल्याचे जनहित फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.