कुरकुंभमध्ये बेकायदेशीर साम्राज्याला राजकीय पाठबळ? तालुकाध्यक्षावर गंभीर चर्चा

आवाज लोकशाहीचा…
विजय चव्हाण ✍️
कुरकुंभमध्ये बेकायदेशीर साम्राज्याला राजकीय पाठबळ? तालुकाध्यक्षावर गंभीर चर्चा होतांना दिसते आहे या भामट्याचे   सर्वश्रुत असताना सुद्धा राजकीय दबावाने नागरिक  नाव.घेत नाहीत ही दहशत या भागात फोफावलेली आहे .
दौंड तालुक्यातील कुरकुंभ परिसर सध्या औद्योगिक विकासापेक्षा वेगळ्याच कारणांनी चर्चेत आला आहे. परिसरात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर धंद्यांना एका राजकीय तालुकाध्यक्षाचे पाठबळ असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. दिवसा संविधान, राष्ट्रपुरुष आणि विचारधारांचे गुणगान… तर रात्री काळ्या व्यवहारांचे संरक्षण—अशी दुहेरी भूमिका असल्याचा आरोप स्थानिक पातळीवरून ऐकू येत आहे.
महामार्गावर अवैध धंद्यांचे जाळे?
पुणे–सोलापूर महामार्ग परिसरात काही ढाबे व हॉटेलांमधून अवैध दारू, गॅस-केमिकल्स व काळाबाजार व्यवहार होत असल्याच्या चर्चा आहेत. या व्यवहारांचा सूत्रधार म्हणून एका स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्याचे नाव पुढे केले जात आहे. कायद्याची भाषा बोलणारा हा व्यक्तीच बेकायदेशीर धंद्यांचा “कंट्रोलर” बनल्याची टीका होत आहे.
दिवसाढवळ्या प्रतिष्ठेचा आव आणणारे हेच चेहरे रात्रीच्या व्यवहारांतून आर्थिक गणित मांडत असल्याचा आरोप आहे. अर्थकारणाचा आधार म्हणून या जाळ्याचा वापर होत असल्याचे बोलले जाते.

कुरकुंभमधील कथित  ड्रॅगस प्रकरण” एकेकाळी जगभर चर्चेत आले होते. सुरुवातीला प्रसारमाध्यमांनी गांभीर्याने घेतलेला हा विषय अचानक थंडावला. नेमके काय घडले? जबाबदारांवर कारवाई झाली का?—याबाबत अधिकृत माहिती सार्वजनिक का होत नाही, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

बांधकाम क्षेत्राचा अनुभव नसलेली काही मंडळी राजकीय आशीर्वादावर ठेकेदारीत घुसल्याची चर्चा आहे. अधिकाऱ्यांवर दबाव टाकून निकृष्ट दर्जाची कामे मंजूर करून घेतल्याचे आरोप स्थानिक पातळीवर ऐकू येत आहेत. अशा प्रकारे “भामटे पदाधिकारी” तयार होत असल्याची नाराजीही व्यक्त होत आहे.
स्वाभिमान की अंधभक्ती?
तालुक्यात वाढत्या बेकायदेशीर व्यवहारांमुळे प्रशासनाची भूमिका प्रश्नचिन्हाखाली आहे. या सर्व व्यवहारांना पाठबळ देणारे काही अंधभक्त मात्र “स्वाभिमान”चे नारे देताना दिसतात. कुरकुंभ पट्ट्यातील अनेक घडामोडी दिवसेंदिवस उघड होत असताना सत्य लपवणे आता अशक्य होत चालले आहे.
प्रश्न थेट आहेत—
कथित बेकायदेशीर धंद्यांना राजकीय संरक्षण आहे का?
ड्रग्स प्रकरणाची अधिकृत चौकशी कुठपर्यंत पोहोचली?
महामार्गावरील अवैध दारू व केमिकल व्यवहारांवर कारवाई का होत नाही?
प्रशासन राजकीय दबावाखाली आहे का?
दौंड तालुक्याचा स्वाभिमान केवळ घोषणांमध्ये नको—
तो कृतीत दिसला पाहिजे