केडगावमध्ये भव्य रक्तदान शिबिरात विक्रमी 333 बॅग; महिलांसह विविध समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग

आवाज. लोकशाहीचा….

विजय चव्हाणा

केडगाव, दि. ७ डिसेंबर
आम्ही केडगावकर आयोजित भव्य रक्तदान शिबिरात रविवारी दिवसभरात तब्बल ३३३ रक्तपिशव्यांचे संकलन होत विक्रमी कामगिरी नोंदली. विशेष म्हणजे महिलांचा लक्षणीय सहभाग तसेच अनेक पती-पत्नी जोड्यांनी एकत्रित रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घातले.

शिबिरात पोलीस कर्मचारी, पोलीस मित्र, पत्रकार बांधव, युवा पिढी आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत वातावरण उत्साहपूर्ण केले. हे शिबिर शिवशंभो ब्लड बँक मोहोळ स्टोरेज आणि निरामय हॉस्पिटल केडगाव यांच्या सहकार्याने पार पडले.

दिवसभर या शिबिराला दौंड तालुक्याच्या माजी आमदार रणजना कुल, माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, भिमा पाटस कारखान्याचे संचालक आप्पासाहेब हांडळ, किरण दादा, अभिषेक थोरात, देशमुख, निलेश कुंभार आदी मान्यवरांनी भेट देत उत्साह वाढविला.


या उपक्रमात आम्ही केडगावकर–बोरीयार्थी, शिवजयंती उत्सव समिती, अखिल भारतीय मराठा महासंघ, भारतीय जैन संघटना, मुस्लीम समाज बांधव, एक मित्र एक वृक्ष ग्रुप, पत्रकार संघटना, पोलीस कर्मचारी व पोलीस मित्र संघटना, स्वामी समर्थ मठ, अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती, फोटोग्राफर असोसिएशन, संयुक्त जयंती उत्सव समिती, समाजोन्नती मंडळ, भीम क्रांती मित्र मंडळ, ब्राम्हण समाज, नाथभक्त परिवार यांच्यासह सर्व केडगाव ग्रामस्थांनी उत्साहाने योगदान दिले.

शिबिरासाठी नितीन जगताप, राहुल हांडळ, दत्ता शेळके, धनराज मासाळ, सलमान खान, प्रितम गांधी, समीर दाफेदार, वसीम बेग, अनिकेत गायकवाड, अर्शद शिकीलकर, सचिन गायकवाड, समीर थोरात, आशिष नहाटा, समीर पठाण, अविनाश खुंटे, निलेश मेमाणे, देवेंद्र पाटील, कवी खोमणे आदींनी विशेष परिश्रम घेतले

लालचंद नगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड व केडगाव व्यापारी संघटना यांनी जागा उपलब्ध करून देत शिबिर यशस्वी करण्यास मोलाची मदत केली.


रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि ३३३ बॅग संकलनामुळे केडगावने समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण केल्याची प्रशंसा सर्वत्र होत आहे.