दौंडच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागातील आरोग्य बांधकामांत सावळा गोंधळ!

आवाज लोकशाहीचा
विशेष वृत्त – विजय चव्हाण (दौंड प्रतिनिधी)

दौंड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम (PWD) उप विभागावर आता जनतेचा रोष वाढू लागला आहे.
“या विभागाची सखोल चौकशी करा, अन्यथा नागरिकांकडून ‘सर्वोत्तम भ्रष्ट व्यवस्थापन’ पुरस्कार द्या!” —
अशा शब्दांत नागरिकांमध्ये संतप्त चर्चा सुरू आहे.

या विभागाने गेल्या काही वर्षांत केलेली कोट्यवधींची विकासकाच्या नावाने केलेली बांधकामे आणि रस्ते बंदिस्त गटारींसह आरोग्य विभागाची कामे टीका टिप्पणीचा विषय बनलेली आहेत तसेच हा सर्व करोभार टक्के वारीखोर ठेकेदारी आणि राजकीय आशीर्वाद या त्रिकुटावर उभी असल्याचे उघड होत आहे.
कामे “सामाजिक हितासाठी” नव्हे तर “काहींच्या खिशासाठी” करण्यात आल्याचा आरोप सर्वत्र होत आहे.

यवत येथे बांधलेले ट्रॉमा सेंटर हे जनतेसाठी नव्हे तर
ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी उभारण्यात आले,
असा जनतेत ठाम विश्वास निर्माण झाला आहे.
या कामाच्या अंदाजपत्रक, बिले आणि प्रत्यक्ष गुणवत्तेचा संबंध तपासल्यास
संपूर्ण चित्र “रुग्णसेवा नव्हे तर निधीसेवा” असल्याचे स्पष्ट होईल. अशी राजरोसपणे ओरड वाढलेली आहे


वरवंड येथे आरोग्य खात्यांतर्गत बांधण्यात आलेले शवगृह बांधले कश्यासाठी हे सद्य त्याची परिस्थिती पाहिल्यावर याचे कोडे पडल्याशिवाय राहणार नाही ठेकेदारी आणि त्याला झोप असणारे अधिकारी आणि या दोघांनाही आशीर्वाद देणारी यंत्रणा तिचा फायदा या ठिकाणी झाला आहे की काय अशा शंका कुशंका ते इमारतीकडे पाहून वादळी चर्चेचे कारण बनले आहे सध्या तेथील आरोग्य केंद्राच्या आत मधील भिंती सध्या तोडण्याचा जोरदार प्रयत्न सुरू झाला आहे हा प्रकार शंकेचा विषय झालेला आहे
याठिकाणी गेली काही वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या बहाना करून बांधकाम केले जाते अशा आरोप तेथील इमारती पाहून केला जातोय

हातवळण उपकेंद्रावर गेल्या दहा वर्षांत तीनदा दुरुस्तीचे काम करण्यात आले,
पण तिथे किती रुग्णांची सेवा होते याची आकडेवारी विचारल्यास अधिकारी मौन धारण करतात

खामगाव येथील आरोग्य केंद्रावर मोठा खर्च करून इमारत उभारण्यात आली.
मात्र तीन किलोमीटरवर गाडेमोडी येथे नव्या इमारतीचे काम सु करण्यात आले.आहे नवीन इमारती बांधायचे होती मग गावठाणं मध्ये इमारतीवर खर्च किती केला त्याची गुणवत्ता आहे का असे अनेक शंकेचे प्रश्न या विभागावर ठपका ठेवणारा विषय आहे

दौंड शहरात उभारण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या इमारतीचे काम
वर्षानुवर्षे पूर्ण होत नाही.
इमारतीची अवस्था दयनीय आहे, तर बांधकाम दर्जा अत्यंत निकृष्ट आहे.
हा जनतेच्या आरोग्याचा नाही, तर ठेकेदारांच्या अधिकाऱ्यांच्या आणि त्यांना आशीर्वाद देणाऱ्या यंत्रणेवर टीकेची झोड उठवणारा विषय झाला आहे


संपूर्ण तालुक्यात आरोग्य खात्याच्या नावाखाली शासन निधी उभा करून
त्यातून ठेकेदार–अधिकारी–राजकीय आशीर्वादधारकांचा त्रिकोणी गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

जर हे आरोप खोटे असतील, तर
या विभागाने सर्व कामांची अंदाजपत्रके, बिले आणि गुणवत्ता अहवाल जाहीर सभेत सादर करावेत —
असे खुले आव्हान नागरिकांनी दिले आहे

अनेक कामांवर “अर्धवट माहितीचे फलक” लावून
जनतेची दिशाभूल केली जात असल्याचे दिसते.शासनाचा मोठ्या प्रमाणात येणारा सामाजिक निधी तसेच आरोग्यासाठी येणाऱ्या निधीवर नागरिकांची दिशाभूल करीत दरोडा टाकण्याचं काम या निमित्ताने सुरू आहे असा सूर सुद्धा नागरिकांच्या चर्चेतून दिसू लागलेला आहे .

दौंडच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाची स्वतंत्र व सखोल चौकशी करण्यात यावी.
प्रत्येक आरोग्य बांधकामाचे अंदाजपत्रक–बिले–गुणवत्ता अहवाल जनतेपुढे पारदर्शकपणे सादर करावेत.
अन्यथा नागरिकांचा विश्वास परत मिळवणे अशक्य ठरेल.
याच प्रकाराने दौंडच विकासाच्या भ्रष्ट कारभाराची मुळे खोलवर रुजलेली आहेत असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही