दौंड: आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी: विजय चव्हाण
अंधाऱ्या रात्रीत मोबाईलच्या ट्रॉचवर बंदिस्त गटारीवरचा स्लॅब टाकणारी आधुनिक यंत्रणा दौंड तालुक्यात विकास कामांसाठी काम करू लागली आहे. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या खुटबाव गावात हे काम केले गेले असून काम करणारा ठेकेदार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तालुक्यातील आहे अशी माहिती हाती आली असल्याने गावात खळबळ उडाली आहे.
रात्रीच्या अंधारातील आणि मोबाईलच्या उजेडात होत असलेल्या कामासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी शासन खर्च करीत असून त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्यासाठी शासनाचा कोणताच प्रतिनिधी घटनास्थळी न्हवता हे विशेष म्हणावे लागेल. राज्याचे उपमुखमंत्री अजित पवार यांच्या तालुक्यातील ठेकदारा असल्याने अधिकारी या कामाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे का? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला असला तरी काम सांभाळण्यासाठी ठेकदराने बिहारचे तज्ञ आणलेले आहेत. त्यांच्याशी संवाद साधला असता आम्ही तीस वर्ष कामे करतोय अशी माहिती दिली आहे.
सदर व्यक्तीने तीस वर्ष मोबाईल लाईट वरच रात्रीची कामे केली आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने पुढे येत असताना या ठेकदाराचा काम करण्याचा नवा आणि आधुनिक फंडा म्हणावा का? अशी मनात शंका येणे साहजिकच आहे.
३०० कोटींच्या गटारीचे काम करणारे ठेकेदार अजित पवार यांच्या मर्जीतील आहेत की तालुक्यात त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे अशी शंका सुद्धा त्यांचा काम करण्याचा फंडा पाहून येणे साहजिकच आहे. कोणते प्रशासन या कामावर नियंत्रण ठेवणारे आहे याचा तपासच ठेकेदार आणि त्याला आशीर्वाद देणाऱ्या यंत्रणे शिवाय कोणालाच माहीत नसून या साठी सरकार ने महाकाय खर्च ३०० कोटी केला त्याची माहिती नागरिकांना मिळावी म्हणून काय दक्षता घेतली आहे. माहिती फलक लावले का? लावले असल्यास कोठे लावले काम किती किलोमीटर आहे.
कुठून सुरू झाले कुठे संपणार आहे कोणत्या कोणत्या गांवात ते होणार आहे याचा आतापर्यंत खुटबाव गावकऱ्यांना सुद्धा तपास नाही ठेकदारा त्याला आशीर्वाद देणारा त्याचा असणारा आका आणि शासनाचे अधिकारी यांच्याच हा खेळ सुरू असून नागरिकांच्या हिताच्या नावाखाली ठेकदराचे आणि त्यातील चिरीमिरीच्या वाटणी साठी तो गुपचुप सुरू आहे का? अशी शंका येणे साहजिकच आहे.
रात्रीच्या अंधारात मोबाईलच्या ट्रॉचवर काम करणारी या ठेकदारांची यंत्रणा आधुनिक म्हणावी लागेल. ठेकदारा आणि त्यांची यंत्रणा दौंड तालुक्यात विकास कामासाठी आगळा वेगळा प्रकार असून अशा प्रकारचा नवीन कामाचा नमुना तालुक्यात आश्चर्यचकित करणार आहे.




