शिक्षणासाठी लागणारे दाखले शाळेतच देणार …तहसीलदार अरुण शेलार

संग्रहित छायाचित्र दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालयातील गर्दी

आवाज लोकशाहीचा
दौंड प्रतिनिधी ……
जाती धर्माच्या शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्यांसह अन्य लागणारे शैक्षणिक दाखले शाळेत विद्यालयात देण्याचा  ऐतिहासिक निर्णय प्रशासनाकडून होतोय, याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशा स्वरूपाचे आव्हान दौंड तहसीलदार अरुण शेलार यांनी केले आहे.
शिक्षण हे अनंत अडचणीतून  जात असून त्याची प्रथम सुरवात जातीचा दाखला असल्याशिवाय होत नाही त्याच बरोबर तो भारतीय असल्याचा दाखला त्याच्या पाल्याचे उत्पन्न किती आहे त्याचा दाखला लागतो .

यासाठी विद्यार्थी आणि  पालक यांना असे दाखले मिळवण्यासाठी वेळ पैसा खर्च करून वेळेत मिळाले नाही की मानसिक त्रास  सुद्धा सहन करावा लागतो .

या घडामोडींचा विचार करून तहसीलदार शेलार यांनी १९ मे ते २१ मे दरम्यान जात उत्पन्न नॉन क्रिमिनल या दाखल्यांसाठी विद्यार्थी वर्गांसाठी विशेष असं शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे या शिबिरातून विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर  दाखले दिले जाणार आहेत हा ऐतिहासिक क्षण विद्यार्थ्यांना दृष्टीने मौलिक आहे हेच दाखले मिळवण्यासाठी निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची मोठी धावपळ होते त्यांच्या पालकांचा आणि त्यांचा वेळ यासाठी मोठा खर्च होतो विशेष करून ते वेळेत मिळवणं प्रचंड अवघड असतं आणि त्याच काळात पुढील ऍडमिशन घ्यायचा असल्याकारणाने ते मिळवण्यासाठी होणारे धडपड जाणारा वेळ आणि होणारा आर्थिक खर्च या सर्वच गोष्टी या शिबिराने संतुष्टात येणार आहे.

शिबिर म्हणजे शिक्षणाच्या नव्या ऍडमिशन साठी तरुणांना दाखल्याच्या अडचणीतून मुक्त करणारा सुकर मार्ग आहे.  शासकीय सुट्ट्या असून सुद्धा कामकाज चालू ठेवण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी दिले आहेत याचा पुरेपूर लाभ विद्यार्थी वर्गाने त्यांच्या पालकांना घ्यावा अशा स्वरूपाचे आव्हान त्यांनी केले आहे.
शिक्षण क्षेत्रातील हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला असून या निर्णयाचे सर्व स्तरावरून स्वागत होत असून तहसीलदार अरुण शेलार आणि त्यांच्या सर्व टीमला शालेय विद्यार्थी त्यांचे पालक आणि शिक्षक वर्ग हे धन्यवाद देऊ लागली आहे.