आर टी ओ विभागाला कार्ड,कामधेनू..पगारापेक्षा जास्त कमाईचे साधन?

दौंड – आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी :- विजय चव्हाण

> *भाग – २ वाचा*

पगारापेक्षा अधिक पैसे मिळवण्याच्या मागे शासनाचे सर्वच स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांची स्पर्धा लागल्याने याचा विपरीत परिणाम समाज व्यवस्थेवर होऊ लागला आहे.कोणाच्या आयुष्यात आर्थिक फटका कोणाला रस्त्यावर जीव गमवावा लागत आहे.हा प्रकार थांबवणे अवघड आहे कारण राज्यकर्तेच लुटारू झाले आहेत असे म्हणण्यास चुकीचे ठरणार नाही  यासाठी आवाज लोकशाहीचा मधून भ्रष्ट कारभाराबाबत मालिका सुरू आहे..

बारामती आर टी ओ हद्दीतून जाणाऱ्या ओहरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनाची चौकशी केल्यास यामध्ये अनेक प्रकारच्या ट्रॅक  मिळतील या मध्ये विविध मालाची वाहतूक करण्यात येत यांची खरी संख्या या विभागापेक्षा कोणालाच सांगता येत नाही .विशेषत ट्रान्सपोर्टचा व्यापार मोठ्या प्रमाणात होतो .अंदाजे अशा गाड्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात माया गोळा होते.

एकट्या दौंड तालुक्यातून याचा अंदाजे आकडा पाहिल्यास हायवा नावाच्या ट्रकची संख्या एक हजार पेक्षा जास्त आहे यातून प्रति गाडी तीन हजार रुपये कार्ड म्हणून घेतले जात आहेत याच आकडा कोटीत जातो,या पेक्षा अजून वेगळ्या ट्रॅक असतात ट्रान्सपोर्टचा कार्ड विषय वेगळा असतो वाहन फिटनेस आणि अन्य कारणांनी पकडलेल्या वाहनाकडून केलेली तडजोड वेगळीच असते याचा बारकाईने विचार केल्यास या विभागाची पगार सोडून मिळणारी अतिरिक्त कमाई अवाक करणारी आहे.हे काम करताना केसेस नावाचे प्रामाणिक काम सुद्धा केले जात आहे.

मात्र त्या कोणत्या वाहनावर करतात याचा मोठा कारभार आहे  केसेस झालेल्या वाहनाची कार्ड यादीत नोंद नसते आणि  त्या नोंदीसाठी वेगळा व्यक्ती कोड द्वारे काम करीत असतो.कार्ड नावाच्या कार्यप्रणालीने बारामतीत आरटीओ यांना पगार सोडून अधिक कमाई करून देणारी यंत्रणा सर्व  परिचित असून कायद्याच्या चाकोरीतून जाणारा अवजड वाहतुकीचा प्रश्न फक्त कार्डच माध्यमातून सुटत असल्याने याची विशेष तक्रार कोणीच करीत नाही .

> *दौंड तालुक्यात माती मुरूम तस्करीत कार्डाची धमाल*

दौंड तालुक्यात हायवा नावाने वाहतूक करणाऱ्या वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.यातून खडी,दगड,मुरूम, माती, याची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते.विशेष करून ही वाहने नंबरप्लेट लावत नाहीत,लावलेली असल्यास ती बोगस असते काही प्लेटवर चिखल शेन लावतात विशेष करून अशा वाहनातून माती मुरूम चोरण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.

हि वाहने देवळगाव गाडा वरवंड खोर दौंड शहर देवळगाव राजे मलठण स्वामी चिंचोली,कुरकुंभ,पांढरेवाडी,पाटस,कानगाव,पारगाव,राहू आणि परिसरातील वाळकी,वडगाव बांडे,मिरवडी,यवत,ताम्हाणवाडी, पिंपळगाव,सहजपूर कासुर्डी,पडवी कुसेगाव रोटी हिंगणीगाडा,वासुंदे,गिरिम सोनवडी,गार या भागांसह नदी लगतच्या काही गावातून मोठ्या प्रमाणात आहेत.या सर्व वाहनाच्या नोंदी कार्ड मध्ये आहेत आणि ज्यांच्या नाहीत त्यांना राजकीय आशीर्वाद असल्याने त्यांना कारवाईची भीती नसते असे चित्र आहे.

सरकारी पगार असलेल्या या विभागाचे फिरते पथक या साठी मोलाची कामगिरी बजावते पथक कारवाई सुद्धा करत आहे.

मात्र कार्डधारक असलेल्या गाड्या सोडून करीत असल्याने त्याच्या या कार्ड कमाईच्या गोरख धंद्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि जे देणारे आहेत त्यांना वरिष्ठ म्हणता त्यांना सुद्धा यातील मलिदा मिळत असल्याने सध्या पगारापेक्षा जास्त पैसे कमावणारे कार्ड बारामती आर टी ओ साठी कामधेनू व्यवस्था झालेली आहे असे म्हणण्यास चुकीचे वाटणार नाही.