वरवंड येथे डीजे वाहनावरील तरुणाचा कमानीला धडकून मृत्यू; घटनेनंतरही गुन्हा दाखल नसल्याने चर्चांना उधाण

filter: 2205; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; motionR: 65536; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 4194304;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 38;zeissColor: film;

आवाज लोकशाहीचा.,

वरवंड (ता. दौंड) : वरवंड गावातील बौद्ध वस्तीजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमानीजवळ डीजे वाहनावरील एका तरुणाला कमानीचा जोरदार धक्का बसल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 26 जून रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बौद्ध वस्तीकडून महामार्गाच्या दिशेने डीजे वाहन जात असताना वाहनावरील संबंधित व्यक्ती कमानीला धडकली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर एक दिवस उलटूनही संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल न झाल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

याबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता, ससून रुग्णालयातील पोलीस चौकीकडे घटनेची नोंद झाली असून तेथील आवश्यक कागदपत्रे संबंधित पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही व गुन्हा नोंदविण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती देण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, स्थानिक नागरिकांकडून अपघातग्रस्त डीजे वाहन, त्याचा चालक, आयोजक तसेच अपघातास कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबाला कायद्यानुसार मिळू शकणाऱ्या सर्व आर्थिक व विमा लाभांबाबत प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणात अपघात नेमका कशामुळे झाला, कोणाची जबाबदारी होती आणि कोणावर कायदेशीर कारवाई होणार याबाबतचा अंतिम निर्णय पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.