आवाज लोकशाहीचा | विजय चव्हाण
दौंड तालुक्यातील वाखारी गाव हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या धनश्री लॉजवर यवत पोलिसांनी टाकलेल्या धाडीत अनैतिक देहव्यापाराचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत तब्बल १० महिलांची सुटका करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दि. १८ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोलीस हवालदार महेंद्र चांदणे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पंच व बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला. या छाप्यात आरोपी प्रदीप पुजारी (मूळ उडपी, सध्या वाखारी) व शहबाज सय्यद (रा. वरवंड) हे महिलांकडून स्वतःच्या फायद्यासाठी देहव्यापार करवून घेत असल्याचे उघड झाले.
या ठिकाणावरून १,००० रुपये रोख रक्कम, ५ कंडोम पाकिटे व ग्राहक नोंदवही जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्हा अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 अंतर्गत दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुवर्णा गोसावी करत आहेत
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आता या प्रकरणात आणखी कोणाचे हात आहेत, याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे.



