कासुर्डीच्या अतिक्रमणाचा विषय दौंडच्या न्यायालयात दाखल!

दौंड:-आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:-विजय चव्हाण

अतिक्रमणाच्या नावाखाली मोजक्याच लोकांची घरे पडलेल्या कासुर्डी ग्रामपंचायतचा विषय न्याय प्रविष्ट झालेला आहे.अतिक्रमणात पडलेल्या घर मालकांनी दळून न्यायालयामध्ये या बाबत तक्रार केलेली होती तक्रार समजून घेऊन न्यायालयाने या संदर्भामध्ये कामकाज चालवण्याची तयारी दर्शवलेली आहे.

या प्रकाराने अन्याय ग्रस्त तक्रारदारांना न्याय मिळण्याचा आशेचा किरण निर्माण झाला असून अन्याय करणाऱ्यांना प्रशासन होईल अशी आशा वाटू लागली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की दौंड तालुक्यातील कासुर्डी गावामध्ये ग्रामपंचायतिला खेटून असणाऱ्या मोजक्याच घरांचे अतिक्रमण म्हणून पंचायतीने जेसीबी मशीनच्या सहाय्याने सहा कुटुंबाचा राहता निवारा जेसीबी यंत्राच्या साह्याने मोडून टाकला होता.ऐन उन्हाळ्यात ही कारवाई झाल्याने या कुटुंबातील परिवार बेघर होऊन उघड्यावर आलेला होता ज्या कुटुंबाची घरे पडली त्या लगतच काही सवर्ण कुटुंब यांची अतिक्रमण मध्ये घरे असून त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई केली नसल्याने ग्रामपंचायत कारभार यांनी राजकीय हेतूने जाणून बुजून हे प्रकरण केल्याची धारणा घर पाडलेल्या कुटुंबां मध्ये निर्माण झालेली आहे.

विशेष म्हणजे दौंड गट विकास अधिकारी यांनी गावातील अतिक्रमण पाडण्यासाठी सर्व आतील क्रमन धारकांना समान न्याय द्यावा योग्य ती कायद्याच्या आधारे कारवाई करावी अशा स्वरूपाची लेखी पत्र सुद्धा काढलेले होते.

मात्र पंचायत प्रशासन आणि गाव पुढारी यांनी या पत्राला कचऱ्याची टोपली दाखवून पायदळी तुडवीत कारवाई केली आणि तीही फक्त भूमी गोरगरिबांच्या घरावर लगत असणारे सदन बागायतदार यांच्या अतिक्रमांना मात्र अभय दिलेला आहे.

परिणामी या अन्यायाची चर्चा गावभर आणि तालुक्याच्या पंचायत समिती ते दौंड न्यायालयापर्यंत गेली होती.न्यायालयाने याबाबतची तक्रार वाचून संबंधित प्रकार न्यायालयात ऍडमिट करून घेतला असून या बाबत कामकाज करणार आहे.

न्यायालयाच्या या भूमिकेने तक्रारदार यांना न्याय मिळण्याची अपेक्षा वाढली असून अन्याय ग्रस्तांवर कारवाई होईल अशी आशा वाटू लागलेली आहे.

गावामध्ये महिला सरपंच आहेत आणि या महिला सरपंचाचा कारभार त्यांच्या घरातील राजकीय कामकाज करणारा व्यक्ती करीत आहे अशी गावभर चर्चा असून वरिष्ठ राजकारणाचा आशीर्वाद असल्या कारणाने बेकायदेशीर रित्या या गरीबाची बांधकामे मशीन लावून पाडण्यात आलेली आहे असा आक्रोश गावभर वाढलेला आहे.

ग्रामपंचायतच्या बाहेर आल्यानंतर क्षणात दिसणारी ही बांधकामे पूर्ण होण्याच्या अगोदर सुरू असतानाच का? थांबवली नाहीत हा खरा प्रश्न या कारभाऱ्यांच्या अतिक्रमण कार्य प्रणालीकडे शंकेने बोट दाखवणारा आहे.

हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याकाराने संबंधित अतिक्रमण काढणाऱ्या ाव पुढार्‍यांची मोठी धावपळ झाली असून त्यांना याबाबत भीती वाटू लागलेली आहे यातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी राजकारणाचे पाठबळ घेण्यासाठी धावपळ सुरू केली असून संबंधित अतिक्रमणधारकांना जागा देतो अशा स्वरूपाची लालूच दाखवून प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत.

पुढार्‍यांनी अतिक्रमण पाडलेल्या कुटुंबांना निरोप देण्यास सुरुवात केलेली असून हे प्रकरण मिटावे म्हणून जीवाची परिक्रष्टा सुरू केलेली आहे.

दौंड तालुक्यात अतिक्रमणाच्या अशा कारवाईमुळे कासुर्डी गावच्या ग्रामपंचायतची बदनामी झाली असून गावातील अन्य अतिक्रमण धारकांना अभय देत मजुरी करून घर बांधणाऱ्या याच लोकांवरती अतिक्रमण करण्याचा दृष्टिकोन काय असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांबाबत राजरोसपणे व्यक्त होऊ लागलेला आहे ज्यांची अतिक्रमणे काढण्यात आली त्या लगतच माजी सरपंच यांच्या बहिणीचे घर असून त्यांचे नातेवाईक शेजारी घर बांधून अतिक्रमानामध्ये गेल्या अनेक वर्ष राहत आहे त्यांच्या अतिक्रमणाला मात्र यांनी काही लावलेला नसल्याने हे अतिक्रमण जाणून बुजून जाती जमातीच्या लोकांवर अन्याय अत्याचाराचा एक भाग आहे अशा स्वरूपाचा पक्का समज गावामध्ये निर्माण झालेला आहे.

या घटनेबाबत सरपंच प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध मिळत नसून त्या लग्नासाठी बाहेरगावी गेलेले आहेत अशा स्वरूपाची माहिती त्यांच्या घरातील कुटुंब प्रमुख देत आहेत ग्रामसेवक हे या गावात नव्यानेच आठ दिवसापूर्वी रुजू झाल्याने त्यांना याबाबतची खोलवर माहिती नसल्याचे ते सांगत असून त्यांना येवत आणि कासुर्डी या दोन गावचा कारभार करायचा असल्याने ते गावच्या ग्रामपंचायत मध्ये माहिती घेण्यासाठी मिळून आलेले नाहीत या सर्व प्रकाराने दौंड तालुक्यातील गोरगरीब जनतेवर राजकीय आश्रयाने अन्याय अत्याचार्य अशीच होणार का अशा स्वरूपाची उद्भुत वाढू लागलेली असून भविष्यामध्ये राजकीय आश्रयाने गरिबांच्या जगण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा स्वरूपाची शंका कुशंका सुद्धा निर्माण होताना दिसत आहे.

दौंड तालुक्यातील कासुर्डी गावातील पाडलेले अतिक्रमण.