दौंड तालुक्यातील पुनर्वसन जमिनीचा महा घोटाळ्याचे केंद्र राज्यात गाजणार |

दौंड:आवाज लोकशाहीचा

दौंड तालुक्यात पुनर्वसनच्या जमीन बोगस मिळवण्यासाठी ग्रामीण भागही मागे राहिलेला नाही दौंड शहराच्या परिसरातील जमिनी वरती जसा एका टोळक्याने डल्ला मारलेला आहे त्याच स्वरूपाचा प्रकार ग्रामीण भागामध्ये झालेला असून कानगाव या गावांमध्ये ३० लाभार्थ्यांनी शासनाला फसूवून जमीन घेतलेली होती ती शासनाने सरकार जमा करून घेतल्याचा प्रकार शासनाकडे असलेल्या माहिती मुळे उघड झालेला आहे.

पुनर्वसन विभागाने ३० लोकांना जमीन वाटप केलेली होती आणि त्याच शासनाच्या एका विभागाने ती बोगस कागदपत्रे देऊन डबल वाटप करून घेतल्याचे नमूद केलेले आहे.हा सर्व प्रकार म्हणजे शासन दलाल यांची अर्थपूर्ण तडजोडीचा कार्यभाग म्हणल्यास चुकीचे ठरणार नाही.

कानगाव मधील जमीन मिळवण्यामध्ये भांबू सदू कोळेकर,कृष्णा संभाजी शेडगे,बवई बाई तुकाराम शेडगे,राजू आणि वासुदेव शिवाजी भोसले,संगीता शंकर दिंडले,योगेश सखाराम मोरे,दत्तू तुकाराम पेठकर,विमल चंद्रकांत पोकळे,मारुती पांडुरंग भोसले,हिरामण तुकाराम लोहेकर,जया श्याम दबडे,रामभाऊ भागुजी साष्टे,शिवाजी विष्णू दबडे,विठ्ठल सोमाजी हनमघर,शशिकांत विष्णू दबडे,जयाबाई दगडू गोरड,इंदुबाई पांडुरंग भोसले,बबईबाई गणपत पासलकर,अशोक मारुती भोसले,चंदर लक्ष्मण काटकर,मंदाबाई बाळू बिटके,सतू गोपाळ दबडे,ज्ञानेश्वर गोविंद दबडे,चंद्रकांत मनोहर वैद्य,गिताबाई विलास भोसले,गोपाळ नरसु निवंगुणे,गणपत गोविंद मोरे,हनुमती गोविंद मोरे या सर्वांनी शासनाकडून फसवणुकीच्या कागदपत्रांच्या आधारे जमीन मिळवलेली होती.तत्कालीन प्रांत अधिकारी दौंड आणि सासवड यांनी या सर्व जमिनी कब्जात घेऊन सरकार नावे नोंदवलेल्या होत्या.

मात्र सध्या त्या सुद्धा वाटप केल्या गेलेल्या आहेत. वाट केलेल्या जमिनींच्या बाबत मोठी शंका असून दौंड तालुक्यातील राजकीय आकाच्या आशीर्वादाने मदन मस्त झालेल्या मोजक्याच दलालांनी या जमिनीवरती डल्ला मारलेला आहे.वाटप पत्र हे वेगळ्या व्यक्तीच्या नावाने झालेले असले तरी त्या व्यक्तीकडून कुलमुखत्यार साठे खत अशा स्वरूपाची कागदी रेकॉर्ड या दलालांनी करून या जमिनीचा विक्रीचा व्यवहार केलेला आहे.अशा स्वरूपाची ठाम पणाची माहिती या जमिनीलगत असलेल्या शेतकऱ्यांची तसेच गावकऱ्यांची आहे..

दौंड तालुक्यामध्ये केडगाव परिसरात दलालाचा मोठा धंदा असून काही दापोडी गावात कलानगर आणि गावठाणातील प्रतिष्ठित व्यक्ती या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत.याच भागातील पत्रकार आणि त्याची टोळी अशा जमिनींसाठी काम करीत असून या कामात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून राजकीय आकाचा आशीर्वाद घेऊन सरकार दरबारी तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्यावरती रुबाब करीत असतात अशी माहिती सुद्धा काही मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी दिलेली आहे.

केडगाव बोरीपारधी दापोडी आणि वरवंड या ठिकाणी काही मोजकेच लोक अशा जमिनींसाठी धडपडत असून त्यांना या जमिनी घेता याव्यात म्हणून ते राजकारण्यांचा पुरेपूर वापर करून घेत असतात अशी तक्रार नागरिकांमधून वारंवार होऊ लागलेली आहे.

वरवंड येथील स्वतःला प्रतिष्ठित समजणारा एक राजकारणी आणि त्याचे बगलबच्चे या धंद्यामध्ये जोरदारपणे कार्य करीत होते.आवाज लोकशाहीचा मधून या स्वरूपाच्या बातम्या सुरू झाल्या नंतर हे बगलबच्चे आणि राजकारणी हा भूमिगत झालेला आहे.अशी सुद्धा माहिती गावकरी देऊ लागले आहे.

केडगाव येथील या जमिनीचा दलाल आणि त्याचा मित्र पत्रकार यांची मोठी टोळी असून या टोळीमध्ये राहू पिंपळगाव यवत सोनवडी येथील त्यांचे सहकारी सामील आहे.असे महसूल विभागातील यांच्या त्रासाला वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी स्पष्टच केले आहे.

पुनर्वसन साठी या तालुक्यामध्ये किती जमिनी सरकारने ताब्यात घेतलेल्या आहेत आणि किती वाटप करायचे आहे याची संचित पुस्तिका दौंड तहसीलदार आणि प्रांत साहेब यांच्याच कार्यालयात नसल्याने या वाटपातील धुमाकूळ जिल्हा पुनर्वसन विभाग यांच्याकडून मोठ्या प्रमाणात होतो आहे.जिल्ह्याच्या या कार्यालयात पूर्व पट्ट्यातील दलालांची टोळी राजकीय आकाच्या आशीर्वादाने नित्याचीच फेऱ्या मारताना नागरिकांना दिसत आहेत..

मात्र राजकीय आश्रय पीडित असलेल्या या टोळक्याला कोणालाही विरोध करता येत नाही अशा स्वरूपाची वस्तुनिष्ठ परिस्थिती आहे.यवत येथील पुनर्वसन जमिनीसाठी धडपडणारा एक ठग राजकीय आकाच्या जीवावरती मोठ-मोठ्या बढाया मारून अशा जमिनी मिळवण्यामध्ये पटाईत झालेला आहे.

या व्यक्तीकडून यवत स्टेशन लडकतवाडी भोसलेवाडी तांबेवाडी उंडवडी या परिसरातील पुनर्वसित जमिनींच्या अनेक भानगडी केल्या गेल्या आहेत अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.उघडपणे याला विरोध करणे राजकीय आश्रयाने पीडित असल्याने सर्वसामान्यांना करणे अवघड झाले आहे.याचा फायदा सदर ठग याने घेतला असून जमीन विक्रीच्या व्यवहारांमध्ये उलट सुलट व्यवहार करून पैसे कमावण्याचा नाम चित्त धंदा निवडलेला आहे.

महसूल विभागाने या तालुक्यासाठी किती पुनर्वसन नागरिकांची लाभार्थींची यादी आलेली आहे.आणि किती क्षेत्र त्यांच्यासाठी वाटप करायचे आहे.अद्याप हीच माहिती मिळवलेली नाही म्हणून तालुक्यामध्ये ७०० एकर वरती बोगस खातेदार मिळून आले असले तरी ही ७०० एकर जमीन परत कोणाला वाटप झाली हा खरा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

दौंड शहरा लगतच्या अशा जमिनी बाबत मोजकेच लोक काम करीत असून यामध्ये राजकारणी बांधकाम व्यवसायिक एक आकार नगरसेवक समाजसेवक स्टॅम्प विक्रेता तत्कालीन मंडळ अधिकारी तलाठी यांचा समावेश होता या सर्व टोळीने शहरा लगतच्या पुनर्वसन जमिनी बाबत जागृत राहून त्यांच्या खरेदी विक्री व्यवसाया वरती मोठी माया कमावलेली आहे.अशी सुधा ओरड दौंड शहरातील नागरिकांची आहे.

दौंड मधील ७०० एकर पुनर्वसन जमिनीच्या घोटाळा राज्यातील एक मोठा घोटाळा

दौंड तालुक्यातील पुनर्वसन जमिनीचा महा घोटाळा राज्यातील अनेक घोटाळ्यांपैकी एक आहे.हा महाघोटाळा सिद्ध करण्यासाठी प्रशासनामधील प्रामाणिक असणारी व्यक्ती आणि त्याचे वरिष्ठ अधिकारी असतील तरच वस्तुनिष्ठ परिस्थिती सर्वांसमोर येऊन या टोळीचा बदमाशी कार्यक्रम उघडा होऊ शकतो.

राज्य सरकारने पुनर्वसन लोकांच्या हितासाठी आणि उद्याच्या महाराष्ट्र विकासासाठी आणि दौंड च्या हितासाठी ह्या जमिनी महत्वाच्या ठरतील यासाठी राज्य सरकारने यात लक्ष घालण्याची मागणी मागणी नागरिकांच्यातून होत आहे..