दौंड:आवाज लोकशाहीचा
पुनर्वसन जमिनीच्या दलालांनी हिंगणीबेर्डी (ता.दौंड) येथील लक्ष्मण हरिभाऊ कोऱ्हाळे यांनी १२ मार्च २०२४ ला गळफास घेऊन आत्महत्या केली असली तरी काही तास अगोदर त्याने आत्महत्या का ? केली याबाबत चिठ्ठी लिहून सोशल मीडिया वरती वायरल केली होती..

या संबंधी दौंड पोलिसात १६ जणांवर संशयित म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यामध्ये काही हिंगणीबेर्डी येथे ज्योतिबा नगर येथील रहिवासी असून काही रहिवाशी पुणे येथील आहेत.
पुनर्वसन जमिनी मधील मलिदा मिळवण्यासाठी कशा स्वरूपांनी गरिबाच्या फसवणूक केल्या जातात त्यामधील हा एक प्रकार दौंड तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात घडल्या आहे या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल असला तरी यातील खरा सूत्रधार केडगाव आणि दौंड शहरातील होता अशी चर्चा आहे राजकीय आश्रयाने त्यांना अभय मिळाले आहे अशी मोठी चर्चा आहे
दौंड शहरातही पंढरी प्रभू गुप्ते मुंबई ओलीस होते यांचं नुकतंच निधन झाले १० जानेवारी २०२५ रोजी मृत पावलेले गुप्ते हे जमिनीच्या संदर्भामध्ये आणि दलाल आणि त्यांच्या टोळीने त्रास दिल्याने मृत पावले अशा स्वरूपाचा आरोप त्यांच्या परिवारांनी केलेला असून या परिवाराने ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना ऑनलाइन तक्रार केलेली आहे.
तर २६ नोव्हेंबर २००८ दिनी ज्ञानदेव विठ्ठल शेंडे याचाही मृत्यू झालेला आहे.आणि या पाठीमागे सुद्धा पुनर्वसन जमीन दलाल त्याचा आका या सर्वांचा हात आहे की वादळी चर्चा झालेली होती.राजकीय आशीर्वाद या दलालांना असल्याने त्यांनीं तालुक्यात आणि दौंड शहरात मोक्याच्या जमिनीवर कबजा केलेला आहे.
दौंड तालुका पुनर्वसन जमिनी विक्रीच्या घोटाळ्याचा केंद्रबिंदू बनला असून या केंद्र बिंदूचा मेन आणि महत्त्वाचा भाग जिल्हा पुनर्वसन विभाग आहे.या ठिकाणाहून अनेक बोगस आदेश झाल्याचे उघड झाले असल्याचा शिक्का मोरतब दौंड पुरंदर प्रांत यांनी जवळपास ७०० एकर अधिक जमीन ताब्यात घेऊन त्याचा दाखला दिलेला आहे.
दौंड शहरात मोक्याच्या ठिकाणी कब्जा केलेल्या जागा दलाल आणि त्याचा आका आपल्या बगल बच्या मार्फत गुंठेवारी प्लॉटिंग करून विक्रीचा व्यवसाय करीत आहे.यामध्ये अग्र-भागी स्टॅम्प विक्रेत्याचे नाव सर्वश्रुत असून सध्या लिंगाळी शिवराज नगर अशा ठिकाणी प्लॉटिंगचे विक्री व्यवहार सुरू आहेत.
असे अनेक खरेदी विक्रीचे व्यवहार दौंड सोडून केडगाव येथील कार्यालयात करण्यात आलेले आहेत आणि केडगाव भागातील जमिनीचे व्यवहार दौंड शहरातली कार्यालयात करण्यात आलेले आहे.हा विरोधाभास करण्यामागचा दलाल आणि त्यांच्या टोळीचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे त्या परिसरातील अन्य लोकांमध्ये याची जागृती होऊ नये हाच होता.
दौंड शहरालगतच्या पुनर्वसन जमिनीमध्ये बांधकाम व्यवसाय उभा करायचा असल्यास त्याची परवानगी नगरपालिके कडून घ्यावी लागते आणि या नगर पालिकेमधील तत्कालीन एका इंजिनीयरने संधीचं सोनं केलेलं आहे.मित्र सगे सोयरे यांच्या नावावरती त्याने ज्या-ज्या पुनर्वसन जमिनीमध्ये परवानगी दिल्या गेल्या त्या त्या ठिकाणी आपल्या मिळकतीसाठी कट्ट करून सगळे सोयरे आणि मित्रांच्या नावा वरती व्यापारी गाळे असतील नेते निवासी संकुल असेल हे घेतलेले आहेत असा आरोप सध्या जोरावलेला आहे.
या जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी स्टॅम्प विक्रेत्याने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याकारणाने सध्या स्टॅम्प विक्रेता सुद्धा त्या परिसरातील बांधकाम उद्योजक बनलेला आहे.शहरांमध्ये अनेक त्यात विक्रेते आहेत.मात्र सर्वांपेक्षा अधिक कमी वेळात माया कमवणारा हा स्टॅम्प विक्रेता लक्षवेधी झालेला आहे.
ग्रामीण भागामध्ये केडगाव परिसरात असलेल्या दलालाने वरवंड येथील एका राजकारणाच्या मदतीने गोपळवाडी लिंगाळी परिसरामध्ये अशा स्वरूपाच्या जमिनी वरती फसवणूक करून विक्रीवर केल्याची जोरदार चर्चा आहे.हा नक्की कोण? हे मात्र कोणी सांगत नाही म्हणून त्यावर बोलत सुद्धा नाही याची परिसरात सखोल चौकशी केली असता तालुक्यातील राजकीय आशीर्वादाचा तो सुभेदार असून आपल्या कार्य प्रणालीमध्ये पुनर्वसन जमिनी व्यतिरिक्त दुसरा व्यवसाय तो करीत नाही.
एखाद्या प्रकरणांमध्ये गुंता वाढल्यास वर्तमानपत्रातून त्याची बातमी येऊ नये म्हणून त्याने पत्रकाराला सुद्धा आपल्या बरोबर घेऊन या धंद्यामध्ये सामील करून घेतले आहे.अशी सुद्धा ओरड जोरदारपणे सुरू झालेले आहे.
हा पत्रकार कोण?
हा पत्रकार कोण? हा प्रश्न मात्र अन्य पत्रकारांना बदनाम करणारा असला तरी सध्या तालुक्यामध्ये बरेच स्वतःला पत्रकार समजणारे पुनर्वसन जमिनीमध्ये खरेदी विक्रीचे व्यवसायासाठी धडपड करताना दिसत आहे.आपल्या पत्रकारितेचा वापर अधिकाऱ्यांवर ती करून या दलाला मदत करील आपले हात ओले करीत आहेत असे काही ठिकाणी निदर्शनास आलेले आहे.लवकरच या पत्रकारांच्या कर्तुत्वाचा बुरखा आवाज लोकशाहीचा कडून फाडला जाऊन त्यांच्या कारभार उघड केले जाईल.
विशेष वाचा
दौंड पाटस रोड वरती अशाच एका पुनर्वसन जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार मागील आठ ते दहा वर्षांपूर्वी करण्यात आलेला असून यामध्ये असणाऱ्या मूळ मालकिनीलाच खरेदीचा व्यवहार करताना गाळण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी वेगळीच महिला उभी करून ही जमीन श्रीगोंदा तालुक्यातील काही मान्यवरांना विकलेली आहे.अशा स्वरूपाची माहिती हाती आली असून याबाबतची वस्तुनिष्ठ परिस्थिती कागदपत्रांसह लवकरच आवाज लोकशाहीचा मधून प्रकाशित करेल !




