यवत:आवाज लोकशाहीचा
मंदिरात झोपलेल्या आई जवळील ४ वर्षाच्या चिमुरडीला घेऊन तिच्यावर विनयभंग करण्याच्या प्रयत्नात असलेल्या यवत येथील नरधमला यवत पोलिसांनी अटक केली आहे.
हा प्रकार २५ जानेवारीला रात्री १२ च्या सुमारास घडला असून तिची तक्रार ठाणे रेल्वे पोलिसांनी घेऊन यवत पोलिसांकडे तपासासाठी पाठवली आहे.
या प्रकरणी यवत येथील कुणाल लक्ष्मण दोरगे अंदाजे २७ वर्षे याला राहत्या घरातून अटक केली आहे.हा प्रकार यवत मधे घडला असताना त्याची दखल ठाणे रेल्वे पोलिसांनी कशी घेतली या वरून यवत मधे शंका कुषणकाचे वातावरण निर्माण होऊन मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,नवऱ्याशी भांडण झालेली एक परप्रांतीय महिला उरुळी कांचन येथून निघून आलेली होती.रात्रीचा सहारा म्हणून तिने यवत येथील महालक्ष्मी मंदिरात विसावा घेतला होता तिच्या बरोबर दोन मुली होत्या पैकी ४ वर्षाच्या चिमुरडीला रात्री बारा वाजण्याच्या सुमारास महिला झोपलेली असताना नराधमाने तिला घेऊन बाजूला आला तिच्यावर अन्याय अत्याचार करण्याच्या तयारीत असताना मुलीच्या आईला जाग आली मुलगी नसल्याने तिने परिसरात शोध घेतला तिला हे कृत्य दिसले तिने आरडा ओरडा केल्याने नराधम पळून गेला मात्र त्याचे कृत्य सी सी टिव्ही मधे कैद झालेले होते.
सकाळी या महिलेला दौंडला कोणी पाठवले
हा प्रकार घडल्यावर महिला दौंड वरून रेल्वेने ठाणे येथे जात होती प्रवासात तिने घडलेली हकीकत एका महिलेला सांगितली या महिलेने ठाणे रेल्वे पोलिसात घडलेली हकीकत सांगितल्यावर ठाणे रेल्वे पोलिसांनी गुन्हा दखल केला आणि तपासासाठी यवत पोलिसांना पाठवला आहे.यवत पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता या नराधमाचे कृत्य त्यांना आढळून आल्यावर ती त्याने त्याला तत्काळ अटक केली आहे.
या सर्व प्रकारात यवत मधे घडलेल्या प्रकार असताना महिला दौंड कडे गेली कशी का तिला कोणी पाठवून दिली हा प्रश्न शंका उपस्थित करणारा आहे. प्रकरण कोण यवत मधील आका दाबण्याचा प्रयत्न करीत आहे का? अशी शंका गावभर वादळ वाऱ्यासारखी भिरभिरत आहे .
यवत पोलीस स्टेशन मधे गावातील एक मद्यस्थी कायम घिरट्या घालत असतो ,दिवसातून येकदा तरी त्याची भेट असते नाहीच दिवसा त्याला येता नाही आल तर संध्याकाळी त्याची चक्कर ठरलेली असते ,आठवड्यातून एकदा का होईना त्याची मोजक्या अधिकारी पोलीस बांधव यांच्याशी जेवणाची पार्टी ठरलेली असते .गेले काही वर्ष त्याचा हा प्रकार व्यवस्थित पोलीस आशीर्वादाने म्हणा सहकार्याने सुरू आहे .याचा विपरीत परिणामी मात्र काही फिर्यादी साठी होतो .त्याच्या शब्दाला पोलीस मित्र आणि अधिकारी किंमत देतात हा त्याचा मोठा प्लस पॉइंट आहे .तो कश्यामुळे असू शकतो या साठी तपास गुप्तचर विभगाकडे द्यावा लागेल.



