दलाला ला दौंडच्या आका टोळीचा हात दलाल बनला त्यांचा  आर्थिक स्रोत..सेवेला दोन दोन अँटी चेंबर

दौंड:आवाज लोकशाहीचा

पुण्यात राहून दौंड तालुक्यात पुनर्वसन जमिनीच्या घोटाळेबाज कारभार करणारा दलाल सातारा येथून आलेल्या युवकांच्या तडाख्यातून आकाने चतुराई करून का? वाचवला हा प्रश्न आकाच्या भविष्याला आर्थिक मदतीचा पक्का स्रोत होता अशी चर्चा नागरिकांच्या आता सुरू झाली आहे.

दौंड शहराच्या परिसरात त्याने अनेक गोरगरीब पुनर्वसन नागरिकांना त्याने जमीन व्यवहारात फसवले आणि आका व त्याच्या टोळीला आर्थिक भरभराटीचा महत्वाचा घटक बनला गेला आहे.पुण्याहून दौंडला आल्यावर त्याची बसण्या-उठण्यासाठी दोन चेंबर वेगवेगळ्या ठिकाणी सेवेला आहेत. त्यात आकाच्या आड्यात आणि स्टॅम्प वाल्याच्या दुकानात काचेची एसी रूम बनवण्यात आली आहे त्यात ठिकाणी आपला जमीन विक्रीच्या घोटाळ्याची कामे तो बिनदास्त करतो आणि बदल्यात या सर्वांना आर्थिक लाभ होत असला तरी गोरगरीबांना मात्र आर्थिक दृष्ट्या फवण्याचे पाप केले जाते आहे.मात्र ज्यांना फसवल आहे.त्या सगळ्यांनी त्याला धडा शिकवण्याचा प्रयत्न केला मात्र आकांच्या आशीर्वादाने त्याचा आता पर्यंत बचाव झालेला आहे.

शहराच्या आसपास त्याने स्टॅम्प विक्रेता,आका,सुपुत्र आणि त्यांच्या टोळीच्या माध्यमातून अनेक परिवाराच्या जमिनी लुटल्या आहेत.

सोनवडी आणि दौंड यांची सरहद्द एकच असून या ठिकाणी मयत आईच्या तीन वारस मुलीना फसवून कवडीमोल भावाने १९७८ साली मिळालेली जमीन फसवून खरेदी केलेली आहे,तिन्ही मुली वारस असणारी जमीन आ** नावाने खरेदी केलेली असली….

तरी या मधे महत्वाची भूमिका दलाल याची असून त्याला साथ स्टॅम्प विक्रेत्याकडून मिळालेले आहे.

कवडीमोल खरेदी करून वारस असलेल्या त्या तीन मुलींना गोड बोलून फसवलेले आहे.त्यांना या बाबत न्याय मागण्यासाठी कोणाचीच मदत मिळाली नसल्याने आणि या टोळीचा राजकीय हस्तक्षेप ताकदीचा असल्याने त्यांना या प्रकरणात गप्प बसण्या शिवाय पर्याय राहिलेला नाही.हा प्रकार ११ नोव्हेंबर २००५ मधील आहे.आज या घटनेला २० वर्ष उलटली आहेत.

आका आणि त्याच्या आशीर्वादाने दलाल आणि त्यांच्या टोळीचे आज आर्थिक सुगीचे दिवस असले तरी त्यांच्या मागे असंख्य गरीब पुनर्वसन शेत जमिनी मालकांच्या फसवणुकीचा तळतळाट आहे.

असाच एक प्रसंग दौंड शहराच्या हद्दीत असलेल्या २ हेक्टर आणि दोन गुंठे जमिनीच्या विषयाचा आहे.१३ नोव्हंबर २००७ मधील घडलेला प्रकार आहे.यात दलाल आणि स्टॅम्प वेंडर यांनी आका यांच्या आशीर्वादाने साठेखत लबाडीने करून घेतले होते. देवळगाव राजे,पुणे ,वडारवाडी गणेशखिंड ,आणि दौंड मधील पासलकर वस्त्तीत असणाऱ्या कुटुंबाला फसवणूक करून जमीन लाटण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांनी बारामती न्यायालया पर्यंत प्रयत्न केलेले आहेत.

आपल्या आका च्या आशीर्वादाने या दलाल आणि स्टॅम्प विक्रेता यांच्या कारभाराला सुगीचे दिवस आल्याने दलाल साठी स्टॅम्प विक्रेते आणि खास सेवा म्हणून एअर कंडिशन केबिन सुद्धा बनवलेले आहे.आपल्या आर्थिक उन्नतीसाठी पुण्याहून येऊन आपल्यासाठी काम करणाऱ्या या दलाल वेळोवेळी आका ने राजकीय पाठबळ देऊन वाचवण्याचा प्रयत्न केले आहेत.

सातारा येथील तरुणांनी दौंड शहरात येऊन घातलेला हैदोस हा सुद्धा एक प्रकार आहे.या प्रकरणे मात्र दौंड पोलिसांना सरकारी पगारावर काम कोणाचे केले हा टीकाखोर प्रश्न दबक्या आवाजात विचारला जाता असताना भाऊसाहेब पाटील या अधिकारी बाबत मोठी टीका-टिप्पणी केली जात आहे..

वाचा..

नगरपालिकेच्या एका विद्वान स्वतःला अधिकारी समजणाऱ्या  व्यक्तीने या टोळीतील काही जमिनीचा भाग कामाच्या स्वरूपाने लाटला असून त्याने ती जमीन  शहराच्या परिसरातच विकून प्रचंड माया कमावलेली आहे सध्या तो सेवानिवृत्त असला तरी आर्थिक दृष्ट्या या टोळीच्या जीवावरती मोठा बलाढ्य बनलेला आहे