पोलिसांना घटनेचे गांभीर्य नाही …परिणाम वाईट होतील.आबा वाघमारे

यवत:आवाज लोकशाहीचा

पिंपळगाव येथील अपघातात मृत पावलेल्या दलित दोन मुलांच्या आई वडिलांच्या दुःखावर यवत पोलीस अधिकारी आणि तपाशी पोलीस आर्थिक तडजोडीने मीठ चोळात आहेत असे चित्र यवत पोलीस स्टेशन मधील कारभार पाहून नागरिकांना दिसून येत असल्याने कोणताही जबदार अधिकारी साधे निवेदन घेण्यास सुद्धा पुढे येत नाही हे याचे मोठे लक्षणच म्हणावे लागेल अशा स्वरुपाची संतप्त प्रतिक्रिया बहुजन परिषदेचे राज्य अध्यक्ष आबासाहेब वाघमारे यांनी दिली आहे.

यवत पोलीस स्टेशन समोर आपल्या मुलांच्या अपघाताचा चुकीचा पंचनामा करून ट्रॅक्टर मालक वाचवण्यासाठी केल्याने आई-वडील नातेवाईकां सह उपोषण करीत आहेत.त्यांना पाठबळ देण्यासाठी आबा वाघमारे हे यवत पोलीस स्टेशनमध्ये आले होते.यावेळी त्यांच्या बरोबर वंचित आघाडीचे ज्येष्ठ नेते उत्तम गायकवाड आणि त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आबा वाघमारे हे उत्तम गायकवाड यांना यवत पोलीस स्टेशन ला दलित कुटुंबाला पाठिंबाचे पत्र देण्यासाठी घेऊन गेले असताना हे पत्र स्वीकारण्यासाठी जबाबदार कुठलाही अधिकारी पुढे आलेला नाही.अर्ध्या तासाच्या वेळानंतर संबंधित ठाणे आंबलदार यांनी पत्र स्वीकारले यावेळी अधिकारी उपलब्ध नव्हते ही बाब वाघमारे यांना खटकल्याने त्यांनी वरील संताप्त प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी ते म्हणाले की,दलितांच्या अन्य अत्याचार वर्णन ही प्रथा पोलीस खात्यामध्ये दिवसें-दिवस वाढत आहे.दोन मुलं मेलेले आहेत,आई-वडील उपोषण करतात आणि पोलीस मात्र गांभीर्याने घेत नाहीत,हे पोलीस स्टेशनच्या अधिकारी यांना शोभनीय नाही.आठ दिवसाच्या आत मध्ये यांनी यावर गांभीर विचार करावा अन्यथा या विषयाचे आंदोलन राज्यभर पेटवण्यात येईल अशा स्वरूपाचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे..

यवत येथील उपोषणाचा तिसरा दिवस असून अपघाताची घटना घडवून चार महिने झालेले आहेत.या प्रकरणी तीन ट्रॉली ऊस भरून चालणाऱ्या ट्रॅक्टर दोषी असताना सुद्धा त्याला अपघात पंचनामा करताना सोडून देण्यात आलेले आहे ही बाब महत्त्वाची आहे.

पोलीस मात्र या संदर्भामध्ये मयत मुलांच्या आई-वडिलांनाच उलट-सुलट प्रश्न विचारीत हा प्रसंग दाबण्याचा यशस्वी प्रयत्न करू लागलेले असल्याने आता या प्रकरणातून दलित संघटना जागृत होत आहेत.याचा विपरीत परिणाम या प्रकरणाला राज्यभर वेगळे वळण लागणार की काय ? अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे..