अपघात पोलिसांनी दडपला आम्हाला न्याय द्या| यवत पोलिसानं समोर दलित कुटुंबातील शोकाकुल आई वडिलांचे उपोषण

दौंड: आवाज लोकशाहीचा

राजकीय दबावामुळे दलीत कुटुंबातील मृत पावलेल्या भाऊ बहिणीच्या आई-वडिलांना यवत पोलिसानं समोर न्याय मागण्यासाठी उपोषण करण्याची वेळ आली आहे.

घटना घडून चार महिने झाले आहेत पोलिस तपासाची दिशा बदलण्यास तयार नाहीत उलट मृत पावलेल्या भाऊ बहिणी च्या आई वडिलांना नको त्या प्रश्नाचा भडिमार करून त्रास देऊ लागले आहेत.

आज उपोषणाचा दुसरा दिवस असून त्यांच्या मदतीला जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सारिका भुजबळ आणि त्यांचे पती यांनी त्यांना खंबीर साथ दिली आहे.

याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की, १४ सप्टेंबर २०२४ रोजी पिंपळगाव (ता. दौंड) येथील कापरे वस्ती जवळ ऊस घेऊन निघालेल्या तीन ट्रॉली ट्रॅक्टर जात असताना दोन दुचाकी एकमेकांना ओहर्ट्रेक करीत होत्या.

दोन्ही धडकल्या दुचाकीवर असलेले दोन्ही भाऊ बहीण ट्रॅक्टरच्या चाका खाली आल्याने भाऊ जाग्या वरच ठार झाला तर बहीण गंभीर जखमी झाली हा प्रकार पोलीस खात्याने दडपला असून दोन जणांच्या मोटर सायकलच्या अपघातातून या दोघांचा मृत्यू झाला अशा स्वरूपाचे निकष नोंदवले हा सर्व प्रकार शंकास्पद असल्याचा संशय मृत व्यक्तीच्या आई-वडिल व चुलत्याचा चुलतीचा असून गेले तीन महिने सदर व विषयासाठी हे सर्व परिवार अनेक ठिकाणी न्याय मिळेल म्हणून भटकंत होते.त्यांच्या या प्रक्रियेला थांबवण्यासाठी यवत पोलीस स्टेशन मधील तपास अधिकारी त्यांच्यासाठी काम करणारा पोलीस कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी यांनी बरेच भागीरथी प्रयत्न केले.

मात्र आम्हाला न्याय पाहिजे या आशेने भटकणार दलित परिवार अखेर जिजामाता ब्रिगेड या अध्यक्ष सारिका भुजबळ यांच्याशी भेटल्यावर त्यांनी पोलीस स्टेशन समोर न्याय मिळवण्यासाठी उपोषण सुरू केले आहे.

या लहान बालकांच्या अपघातील प्रकरणांमध्ये ट्रॅक्टर हा सर्व गावाला परिसराला माहिती असून पोलिसांच्या तपास यंत्रणेला उगाच कशाला सामोरे जायचं म्हणून कोणीही पुढे येत नाही विशेष म्हणजे यामध्ये एका मोठ्या राजकारणाची पोर तसेच त्यांचे बगलबच्चे पोलीस अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत असा आरोप सुद्धा या परिवाराकडून होऊ लागला आहे.

पोलिसांना तपास कामी कुठलाही धागा धोरण नसताना असंख्य गुन्हेते उघड करतात मात्र या प्रकरणात तुम्ही नाव सांगा ट्रॅक्टरचा नंबर सांगा दोन साक्षीदार द्या,अशा स्वरूपाच्या उलट स्वरूपाचे प्रश्न त्या आई-वडिलांना विचारून जर्ज करताना दिसत आहेत.

प्रश्न अपघातात मृत पावलेल्या भाऊ बहिणीच्या न्यायाचा असलं तरी घटनेतील सत्य परिस्थिती पोलिसांनी लपवण्याचे कारणच काय? याचा शोध होणे महत्त्वाचे आहे.या प्रकाराने पोलीस खात्यामध्ये न्याय मिळण्याची व्यवस्था संपली की काय? हा प्रश्न मात्र तालुक्यातील दलित समाजास तालुक्यातील नागरिकांना निर्माण होताना दिसत आहे..