पुनर्वसन जमीन धारकांना दलाल , आका स्टॅम्प विक्रेता आणि टोळीचा त्रास…दौंड शहरात मोठा धुडगूस

दौंड:आवाज लोकशाहीचा

दौंड शहर व परिसरातील गावात पुनर्वसन जमिनीचे लाभार्थी व विक्रेते यांच्या तपशिलाचा प्रामाणिक चौकशी केल्यास दौंडचा आका त्याच्या बळावर काम करणारा दलाल या सर्वांना मदत करणारा स्टॅम्प विक्रेता आणि यांच्यासाठी काम करणारी त्यांची टोळी या सगळ्यांचाच पोल खोल झाल्याशिवाय राहणार नाही अशा स्वरूपाचा आत्मविश्वास ज्यांना या टोळीकडून त्रास झालेला आहे त्या परिवाराकडून व्यक्त होताना दिसत आहे.

पुण्यात राहून दौंड शहराच्या परिसरातील पुनर्वसन नागरिकांच्या जमीन मालकांना गोड बोलत जवळीक करायची बदल्यात चांगल आर्थिक मदत मिळवून देतो अस सांगायच आणि त्यांच्याकडून स्टॅम्प विक्रेतेच्या मदतीने दस्तऐवज करून घ्यायचे अशा स्वरूपाचा त्याचा धंदा गेले अनेक वर्षापासून राजरोसपणे सुरू आहे.

महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा या दलालाच्या मलिदया वरती चुकीची कार्यप्रणाली राबवीत पुनर्वसन जमिनीच्या विविध कागदपत्रांमध्ये बदल करीत टोळीला मदत करण्याचे पाप केले आहे असा आरोप या सर्वांकडून होऊ लागला आहे.

शहराच्या परिसरातील पुनर्वसनाच्या सर्व जमिनीची  गेली पंधरा वीस वर्षापासून ज्यांनी ज्यांनी कुलमुखत्यार पत्र,बिनताबा साठेखत,करून घेतलेले आहेत त्यांच्यात सर्वाधिक या दलाल आणि त्यांच्या टोळीचा  मोठ्याप्रमाणात सहभाग आहे.असे ठाम मत सुधा ही त्रासलेले नागरिक व्यक्त करीत आहेत.

या टोळीतील सध्या स्टॅम्प विक्रेता गेली काही वर्षात बांधकाम व्यवसायिक,हॉटेल मालक आणि व्यापारी गाळे धारक बनला आहे.त्याच्या सर्व प्रॉपर्टीची कसून चौकशी केल्यास त्यांच्या लीलया उघड होउन त्यांची अब्रू चव्हाट्यावर उघडी झाल्याशिवाय राहणार नाही.कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या या व्यक्तीने कोणते असे काम केले की त्यांची संपत्ती हॉटेल गाळे आणि जमीन विक्री व्यवसायात भरभराट करीत आहेत.अशी चर्चा नागरिकांच्या होऊ लागली आहे.

शहराच्या परिसरात हीच टोळी बांधकाम व्यवसायिक बनलेली आहे.मात्र नाव ऐकाचे आणि फायदा सर्वांचा हा फंडा जोपासत त्यांनी गेली २० वर्ष शहरात आणि परिसरातील लिंगाळी,सोनवडी,गोपाळवाडी,दौंड,पाटस रोड तसेच शहराच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये पुनर्वसन विभागाच्या मदतीने गोर-गरिबांना जमिनी पुनर्वसनाच्या मिळालेल्या आहेत.त्यांच्या वेगवेगळ्या युक्त्यांनी ह्या जमिनीत लुबाडण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहे अशा स्वरूपाची माहिती सुद्धा यावेळी मिळू लागली आहे.

शहरांमध्ये या बरोबर अनेक स्टॅम्प विक्रेते काम करीत आहेत.त्यांच्या तुलनेत हा स्टॅम्प विक्रेता बिल्डर झाला असून सध्या लिंगाळी चौक,बालाजी नगर,शिवराज चौक,समतानगर,बोरीबेल,हिंगणीबेर्डी या पट्ट्यात प्लॉटिंग करून जमिनी विकत आहे.

वास्तव्यामध्ये या सर्व जमिनी आका आणि त्यांचे सहकारी यांच्या असून त्याच्या नावाने  विकल्या जात नाही म्हणून हा स्टॅम्प विक्रेता त्यांच्यासाठी प्रामाणिक बनलेला आहे.स्टॅम्प तो या टोळीत राहून आर्थिक दृष्ट्या एवढा मोठा होऊ शकतो मग या दलालाची आणि त्याच्या आकाची तसेच त्यांना मदत करणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांची आजची आर्थिक परिस्थिती किती मोठी असेल याचा अंदाज घेणे काळाची गरज असली तरी त्यांच्या त्रासला वैतागलेला जमीन मालक मात्र त्यांना रोज शाब्दिक  शिव्या शाप आणि लाखोली वाहत आहे.

दौंड शहरांमध्ये या टोळीची मोठी दहशत असून एकाने पुनर्वसन जमिनी पाहिजे दुसऱ्याने कागद तयार करायचे आकाने राजकीय दहशत देऊन अधिकाऱ्यांना राजकीय दाबाने वेठीस धरून मनासारखे काम करून घ्यायचे या त्यांच्या कार्य प्रणालीने मात्र मूळ जमीन मालक आर्थिकदृष्ट्या अडचणीत येऊन यांच्या जाळ्यात जाऊन फसले आहेत ही बाब मात्र नाकारता येणार नाही.यासाठी ज्यांची फसवणूक झालेली आहे त्या सर्वांन कडे जाऊन त्यांच्याशी बातचीत केल्यास सत्य  उघड झाल्याशिवाय राहणार नाही