आवाज लोकशाहीचा:दौंड प्रतिनिधी
पुनर्वसन जमीनी खरेदी विक्रीसाठी दौंड शहरांमध्ये राजकीय पाठबळ मिळालेल्या एजंट ने आणि एक स्टॅम्प विक्रेत्याच्यां मदतीने प्रस्थापित राजकारणाचा सुपुत्र यांची मदत घेऊन मोठा धुडगूस घातलेला आहे.
या सर्वांच्या त्रासाने पोलीस दलात सेवा करणाऱ्या कुटुंबीयांची मोठी पिळवणूक झालेली असून त्यांच्या दोन भावानं मधील एका भावाचा नुकताच मृत्यू झाला आहे.या परिवाराने मृत्यूचे कारण हे धुडगूस घालणारे आहेत अशा स्वरूपाचा आरोपच केल्याने मोठी खळबळ उडाली आहे
परिवाराची कहाणी ऐकल्या नंतर दौंडची ही वाटचाल बीडच्या दिशेने चाललेली आहे की काय? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो,
याबाबत आवाज लोकशाहीच्या हाती आलेली माहिती अशी की दौंड शहरांमध्ये जमीन गट नंबर १७१ मध्ये पाच गुंठे जमीन अमरसिंह किसंनसिंह ठाकूर यांच्या ए.पि.एस.कन्ट्रक्शन कंपनीसाठी कुलमुखत्यार पत्र करून दिली होती १७ सप्टेंबर २०१० रोजी हे कुलमुखत्यार पत्र दौंड येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त क्रमांक,३७७९/२०१० ने नोंदवले गेले.
या कुलमुखत्यार पत्राच्या नंतरच खऱ्या अर्थाने या परिवाराला त्रास सुरू झाला ज्या जागेसाठी कुलमुखत्यार करून देण्यात आलं होतं त्या ठिकाणी होणाऱ्या सदनिकेत या परिवाराला मोबदल्या पोटी फ्लॅट आणि दुकाने देण्याचे मान्य करण्यात आले होते.
जमिनीच्या वरती बांधकामाला ठाकूर यांनी सुरुवात केली मात्र दरम्यानच्या काळात त्यांच्याकडून ते काम बंद पडू लागलं कामाला उशीर होतो म्हणून करार पत्र करून देणाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित घटनेबाबत चौकशी केली संबंधित बांधकाम व्यावसायिका आर्थिक समस्येने अडचणीत आल्याने काम पूर्ण करू शकत नाही अशा स्वरूपाच्या निकषापर्यंत पंढरीनाथ प्रभू गुपचे श्रावण प्रभूचे हे गेले होते.
जागेवरील अर्धवट होत असलेलं बांधकाम पूर्ण व्हावे आणि कुलमुखत्यार मध्ये ठरल्याप्रमाणे आपल्याला आपला मोबदला मिळावा या विचारात असणाऱ्या या दोन भावांना संबंधित कुलमुखत्यार पत्रकरून घेणाऱ्या ठाकूर यांच्याबाबत कायदेशीर बाबी करून त्यांना त्या कामापासून बाजूला काढण्यासाठी काम करावे लागले यासाठी त्यांनी २८ ऑगस्ट २०१२ रोजी संबंधित ठाकूर यांना नोटीस नोटीस सुद्धा दिलेली आहे यामध्ये योग्य त्या माहितीचा तपशील नमूद करण्यात आलेला आहे.
सदर व प्रकारानंतर या जागेवरील बांधकाम व्यवसायामध्ये स्थानिक राजकीय मान्यवर पुनर्वसन जमिनीचा दलाल एक स्टॅम्प विक्रेता राजकीय मान्यवराचा पुत्र आणि काही यांच्या टोळीतील सहकारी सामील झाले आणि खऱ्या अर्थाने या कुटुंबावर ती अडचणीची आणि समस्याची मालिका सुरू झाली यातूनच त्यांच्यापैकी पंढरी प्रभू गुपचे याला मृत्यू आलेला आहे अशा स्वरूपाचे आरोप या कुटुंबाने केलेली आहे.
यामध्ये असणारा पुनर्वसन जमिनीचा दलाल याने अनेक जमिनी अशाच प्रकारे फसवणूक करून लुबाडून दिशाभूल करून कमावलेल्या आहेत असा आरोप करीत या लबाडाला राजकीय पाठबळ दौंड शहरातूनच दिले गेले आहे असा आरोप केलेला आहे.
सद्या या परिवारातील.महत्वाचा व्यक्ती मृत्यू पावला आहे त्यांच्या वर हा आघात झाला असला तरी त्यांच्या घराचं आणि जागेचा प्रश्न अनेक गुंत्यात अडकला.होता मयत व्यक्ती तो सोडावू शकला नाही त्याच्या पाठीमागे आता या परिवाराला तो सुटणार कसा हा प्रश्न मोठा अडचणीचा झाला असला तरी तो नक्की काय आहे याचा विचार या निमित्ताने पुढे आला आहे .याचा तपास प्रमाणिक पणाने केल्यास दौंड मधे सुधा बीड मधील कराड प्रवृत्ती उघड झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास हा परिवार ठाम पने व्यक्त करीत आहे



