पाटस ग्रामपंचायतीचा कारभार नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

  डेपोमध्ये  कचरा जाळला जातो! कारवाईची नागरिकांची मागणी!

आवाज लोकशाहीचा:दौंड प्रतिनिधी

दौंड तालुक्यातील पाटस ग्रामपंचायतीने घाण,प्लास्टिकचा केर कचरा व्यवस्थापन डेपोतील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्या ऐवजी तो जाळून जागीच नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे.परिणामी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.संबंधितावर खडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे.

याबाबत विधीतज्ञ रणजित भंडलकर यांनी दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी,दौंड तालुका आरोग्य अधिकारी आणि प्रदूषण महामंडळाकडे लेखी तक्रार केली आहे.

पाटस ते दौंड रस्त्यालगत काही अंतरावर असलेल्या अंबिकानगर या लोकवस्ती जवळ पाटस ग्रामपंचायतीने गावातील घाण केरकचरा याची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा व्यवस्थापन डेपो केला आहे.हा कचरा डेपो होऊ नये यासाठी त्यावेळी ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता.

मात्र या डेपोत घाण आणि केर कचरा आणि घाण याची स्वच्छता करून त्याची योग्य विल्हेवाट लावून ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे आश्वासन ग्रामपंचायत प्रशासन दिले होते.

मात्र मागील पंधरा ते वीस दिवसापासून ग्रामपंचायत प्रशासनांकडून या ठिकाणी उघड्यावर केर कचरा,प्लॅस्टिक कचरा व घाण आणून टाकली जात आहे. आणि ती जाळली जात आहे. परिणामी या परिसरातील अंबिकानगर,रोहिदास नगर तसेच नागेश्वर मंदिर परिसरात जाळण्यात आलेल्या केर कचराचे धुराचे लोट हवेच्या द्वारे जात आहे.तसेच हवेत हे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

ज्येष्ठ नागरिक महिला आणि लहान मुलांना संसर्गजन्य तसेच गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.ग्रामपंचायत प्रशासनाकडे तोंडी तक्रार केली तरी दखल घेतली जात नाही.नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि स्वच्छतेच्या दृष्टीने ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस उपयोजना केली जात नसल्याचा आरोप नागरिक करीत आहे.

ग्रामपंचायत नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी विधितज्ञ रणजीत भंडलकर यांनी दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, दौंड तालुका आरोग्य अधिकारी, दौंड तहसीलदार आणि प्रदूषण महामंडळाकडे लेखी निवेदन दिले आहे.

ग्रामपंचायतीचे संबंधीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली असून कारवाई न झाल्यास आंदोलनाचा करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

याबाबत दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उज्वला जाधव यांच्याशी संपर्क साधला असता पाटस हद्दीत जाळण्यात येत असलेल्या घाण आणि केर कचरा संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तत्काळ घटनास्थळाची पाहणी करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.