पत्रकारिता साधी गोष्ट नाही तिच्या प्रमाणिक पणातून राष्ट्राची उत्तम निर्मिती होऊ शकते…. आर,एस,यादव

आवाज लोकशाहीचा
वरवंड:प्रतिनिधी

पत्रकारिता हि साधी सरळ बाब नाही तिचा प्रामाणिकपणे वापर झाल्यास उत्तम राष्ट्र निर्मिती साठी असणारी महत्वाची घटना आहे म्हणून तिला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संबोधले जात आहे.अश्या स्वरूपाचे ठाम मत प्रसिद्ध विचारवंत व छत्रपती,फुले शाहू आंबेडकर प्रख्यात प्रबोधनकार आर.एस.यादव यांनी व्यक्त केला आहे.

दौंड तालुक्यातील स्वर्गीय पत्रकार  वि, रा, उगले यांच्या स्मरणार्थ आणि तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून पाटस येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालया मध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांनो व्यक्त व्हा! या विषयासाठी एक दिवसाचा मेळावा जेष्ठ पत्रकार एम जी शेलार आणि वसंत कदम आंच्या विचाराने आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी यादव यांना आमंत्रित करण्यात आले असताना त्यांनी वरील मत व्यक्त केल आहे.

यादव बोलताना पुढे म्हणाले की, पत्रकार ही व्याख्या समाज हिताच्या उन्नतीचा मार्ग आहे.लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणून त्याची गणना करण्या मागची अनेक कारणे आहेत.पत्रकार हा शासनाच्या कार्य प्रणालीवर अंकुश ठेवणारी प्रणाली आहे.राज्य करताना सुव्यवस्थेचा कारभार करण्यासाठी धारेवर धरणारी व्यवस्था आहे.

दुबळ्या जनतेला न्याय मिळवून देणारा दुवा आहे.पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक उन्नतीचा मार्ग निर्माण होतो.ते क्रांतीच पाऊल आहे.अन्याय अत्याचाराच्या कहाणी वरती अंकुश ठेवणारे साधन आहे.पत्रकाराच्या भूमिके मध्ये दिवसेंदिवस बदल होऊ लागलेला आहे.पत्रकारिता निःपक्षपाती केल्यास समाजा मध्ये क्रांतिकारक बदल घडू शकते.

मात्र तीच पत्रकारिता कोणाच्या तरी दबावाला बळी पडून लागल्यास सामाजिक प्रश्न निर्माण होऊन समाजातील घडी विस्कळीत होते.परिणामी त्याचा विपरीत परिणाम जन जीवना वरती निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडून जातो मानवतेचा धर्म यानिमित्ताने अडचणीत येतो आणि समाज सुव्यवस्थेचा एक किरण यामुळे अंधारमय होऊन जातो.

वृत्तपत्र आणि पत्रकारिता हे सामाजिक बदलाचे दोन अंग आहेत.पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ म्हणून गणला गेलेला आहे.त्याच्या प्रामाणिकपणाने शासन लोकप्रतिनिधी आणि समाजात व्याभिचार करणाऱ्या सर्वांवरती अंकुश राहतो,वृत्तपत्रातील त्याच्या अशा बातम्यांमुळे चळवळ निर्माण होते.चळवळी या क्रांती करतात क्रांतीतून लोक जागृती होतात हे लोक जागृतीने सामाजिक जीवनाचा प्रवास हा लोक हितकारक होऊन समाजामध्ये समता बंधुत्व भाईचारा अशा घडामोडी निर्माण होता आणि समाज चांगुल पणाच्या जीवनाचा प्रवास करू शकतो,

पत्रकाराने जागरूक राहणं हा त्याचा सर्वात मोठा पत्रकारितेशी केलेला प्रामाणिकपणा असतो आणि तो पत्रकारितेला बांधील असावा अशी महत्त्वाची बाब आहे.मागील काही वर्षांपूर्वीच्या पत्रकारितेत सध्या प्रचंड बदल झालेले आहेत.पत्रकारितेचे विविध स्वरूपाचे प्रकार निर्माण झालेले आहेत.पूर्वी गावोगावी फिरून बातमी जमा करणारे पत्रकार आता घरबसल्या बातमीदारी करू लागलेली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स मीडिया सोशल मीडिया प्रिंट मीडिया अशा विविध स्वरूपाने पत्रकारांची विभागणी झालेली आहे.हल्लीच्या काळात या काही मीडिया मधून ब्रेकिंग न्यूज करण्यासाठी शर्यती तयार झालेले आहेत.या शर्यती मधून बातमीचा स्तर उंची काही प्रमाणात कमी होऊन नागरिकांमध्ये बातमीच्या फायद्या ऐवजी तोटे जाणू लागलेले आहे.

पत्रकार हा निर्भीड असला पाहिजे.अशा पत्रकारितेमुळे पिचलेल्या दबलेल्या समाजाला न्याय मिळू शकतो,तसेच मस्तावलेल्या प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी महत्त्वाचा उपयोग होऊ शकतो,पत्रकार हा समाजाचा आरसा आहे,म्हणून दर्पण नावाचं पहिलं वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी निर्माण केलं त्याचं प्रतीक म्हणून पत्रकार दिन ६ जानेवारी रोजी सर्वत्र साजरा केला जातो अशी माहिती यादव यांनी दिली आहे..

ते पुढे म्हणाले की,पत्रकारिता इतकी सोपी बाब नाही,पत्रकारितेने या समाजातील जडणघडणीमध्ये महत्त्वाचे काम केलेले आहे,असे सांगताना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील आणि या देशव्यापी अनेक घडामोडींची पत्रकारितेमधून झालेल्या बदलांचे उदाहरण सुद्धा त्यांनी यावेळी दिली आणि ते म्हणाले पत्रकारांमुळे समाज घडतो,पत्रकारामुळे परिवर्तन घडते, परिवर्तनाचा उपयोग सामाजिक सलोख्यासाठी होतो आणि सामाजिक सलोख्यातून ऐक्य निर्माण होते आणि ऐक्याचा उपयोग पर्यावरण गाव तालुका जिल्हा राष्ट्र आणि देशासाठी महत्त्वाचा ठरतो म्हणून पत्रकारिता ही साधी बाब नसून पत्रकारिता ही एक मोठी स्वरूपाची सामाजिक क्रांती करणारी घडामोड आहे. म्हणूनच तिला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून गणले गेले आहे.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार एम,जी,शेलार यांनी  वसंत कदम मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला,अनेक प्रकारांनी आपल्या मनातील पत्रकारिता बाबत असली कल्पना मनोगतातून व्यक्त केली याप्रसंगी जेष्ठ पत्रकार एम जी  शेलार यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकारांनी मनोगते व्यक्त केली. तालुक्यामध्ये अनेक पत्रकारांच्या संघटना असून हा कार्यक्रम तालुक्यातील सर्व पत्रकार म्हणून प्रथमच करण्यात आला आहे.