आवाज लोकशाहीचा…
भीमाचं रक्त आहे… भीत नाही कुणाच्या बापाला पत्रकाराच्या एकाच पोस्टने पुणे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे, या प्रकाराने दौंड तालुक्यात मोठा गोंधळ उडालेला आहे
तालुक्यात दडपशाही की हिटलरशाही? सत्य मांडणाऱ्या पत्रकाराला धमकी दिल्याने नागरिकांच्या मध्ये या विषयाने चर्चेचे काहूर उठले आहे
तालुक्यातून सध्या सोशल मीडियावर एका पत्रकाराची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे, ज्याने केवळ तालुकाच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढले आहे. “भीमाचं रक्त आहे… भीती नाही कुणाच्या बापाला.!” या अत्यंत जाज्वल्य आणि स्वाभिमानी शब्दांनी सुरू झालेल्या या पोस्टने येथील. दडपशाहीवर आणि हुकूमशाही प्रवृत्तीवर बोट ठेवले आहे.?
एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने तालुक्यातील ज्वलंत वास्तव आणि वस्तुनिष्ठ बातमी दाखवली आणि बुडालाच आग लागल्याने. संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट पत्रकारालाच धमकी दिल्याचे वृत्त समोर आले आहे.
तालुका स्वतःची जहागीर समजून दमदाटी सुरू झाली?” असा संतप्त सवाल आता सामान्य दौंडकर विचारू लागले आहेत.
पत्रकारितेला काही जणांनी हुजरेगिरी आणि गुलामगिरीचे स्वरूप दिल्याचा गंभीर आरोप आता नागरिक उघडपणे करत आहेत. काही तथाकथित पत्रकार लाचारी साठी तालावर नाचत असून, पत्रकारितेच्या नावाखाली खालील काळे धंदे फोफावल्याची चर्चा आहे:
ठेकेदारी आणि कमिशनबाजी
पुनर्वसन जमिनींचे संशयास्पद व्यवहार
दलालीचे अथांग जाळे
या सर्व माध्यमातून स्वतःची घरे भरणारे लाडके पत्रकार एकीकडे मिरवत असताना, दुसरीकडे मात्र जीवावर उदार होऊन खरी पत्रकारिता करणाऱ्यांची ‘मुस्कटदाबी’ केली जात आहे.
हा प्रकार अनेक पत्रकारांनी भोगला आहे मात्र तोंड दडवून काहींची हुजरेगिरी सुरू आहे मागील काळात एक पत्रकार असाच भिडला आणि नडला सुद्धा मात्र अनेकानीं लाळघोटे प्रकार निर्लज्य पना सारखा सुरूच ठेवलेला आहे अशी टीका टिपणी या विषयाने नागरिक करू लागले आहेत.
“दौंडमध्ये लोकशाही शिल्लक राहिली आहे की हुकूमशाही पद्धतीने कारभार चालतोय?” असा थेट सवाल विचारत आता जनताच या दडपशाहीच्या विरोधात उभी ठाकताना दिसत आहे.
एकीकडे तालुक्यातील अनेक प्रश्न गंभीर असताना मोजकेच पत्रकार याबाबत जनजागृती करतात ,मात्र पत्रकाराची झुल पांघरूण काही जणांनी आपली इज्जत इभ्रत याच हुकमी हिटलर स्वभावाच्या उंबऱ्यावर जणू गहाण ठेवलेली आहे .
या टीकेचे मानकरीच पत्रकार होताना दिसत आहेत .तालुक्यात अशा प्रकरणाचा मोठा भरणा असून नागरिकांच्या हितापेक्षा तुकडा टाकणार त्यांना महत्वाचा ठरला आहे अशी वादळींती टिपणीने पत्रकारांची अब्रूच नागिकाने चर्चेतून गावात उघडी केली आहे .
तालुक्यात सध्या जनतेचे ,शेतकऱ्यांचे ,विद्यार्थ्यांचे वृद्धांचे महिलांचे,पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचे, शैक्षणिक सुविधांची, आरोग्याची स्वच्छतेची कचऱ्याची माती चोरांचे मुरूम चोरटे नैवेद्य दगड खाणी हे सर्व प्रश्नच नाही असा समज पत्रकाराची झुल पांघरूण हुजरेगिरी करणाऱ्या पत्रकारांचा झालेला असून आले गेले. खोकले, वकले. कानात बोलले. अशा बातम्यात ते धन्यता समजता, आणि एखादा.पत्रकार याच बाजू मांडत आल्यास त्याच्या विषयी कान फुकून गैरसमज पसरवण्यात आपली कर्तबगारी बजावत असल्याने खरी बातमी.देणाऱ्या पत्रकारांवर अशी वेळ आलेली आहे असा खुलासा नागरिक करताना दिसत आहेत.
नागरिकांच्या मते, दौंड तालुक्यात गेल्या २० वर्षांत वस्तुनिष्ठ आणि निर्भीड पत्रकारिता पद्धतशीरपणे गाडली गेली आहे. फक्त आणि फक्त स्तुतीपाठक बातम्यांची स्पर्धा लावली गेली. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकारामागे असलेल्या त्या “हिटलरशाही” नेत्याचे नाव घेण्याची हिंमत कोणी उघडपणे करत नसले, तरी त्याची दहशत किती खोलवर रुजली आहे हे यावरून स्पष्ट होते.
“आज नाही तर उद्या, वेळ प्रत्येकाची येते! या दडपशाहीचा आणि हुकूमशाहीचा हिशोब जनता योग्य वेळी चुकता केल्याशिवाय राहणार नाही!”
‘
“पत्रकारिता ही सत्तेची गुलाम आहे की लोकशाहीचा चौथा स्तंभ?”
दबावापुढे झुकून हुजरेगिरी करायची की जनतेचा आवाज बनून लढायचं, हा संघर्ष आता दौंड तालुक्यात निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. ‘आवाज लोकशाहीचा’ या दडपशाहीचा ही तीव्र निषेध करत असून, खऱ्या पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे!



