आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण…
“जी माणसं इतिहास विसरतात, ती इतिहास निर्माण करू शकत नाहीत!”
हे वाक्य फक्त शब्द नाहीत… ती एक जाज्वल्य चेतना आहे!
१६३० ते १६८० हा काळ… महाराष्ट्राच्या मातीने स्वराज्याचं स्वप्न साकार होताना पाहिलं.
माता जिजाऊंच्या संस्कारातून घडलेले, रयतेचा राजा – छत्रपती शिवाजी महाराज!
ज्यांनी मोगलांच्या प्रचंड सत्तेला आव्हान देत अठरापगड जाती-धर्मांना एकत्र करून स्वराज्य उभं केलं…
हे फक्त इतिहास नाही – ही आपल्या अस्तित्वाची ओळख आहे!
आजही महाराष्ट्रातील प्रत्येक घरात शिवछत्रपतींचा आदर, अभिमान आणि प्रेरणा जिवंत आहे.
आणि याच परंपरेचा एक वारस…संभाजी राजे छत्रपती कोल्हापूर he आज दौंड तालुक्यातील बोरी पारधी-या गांवात येथे येतोय,
ही केवळ घटना नाही – तर संपूर्ण ग्रामीण भागासाठी अभिमानाची गोष्ट आहे!
आजच्या काळात पैशासाठी नाचणाऱ्या कलाकारांकडे तरुणांची झुंबड उडते,
पण शौर्य, त्याग आणि इतिहासाची खरी गाथा कुठे हरवतेय, हा प्रश्न उभा राहतो!
छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलं, ते मानवतेच्या कल्याणासाठी केलं.
त्यामुळेच ते आजही प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहेत.
आज शुक्रवार दिनांक २२ मे संध्याकाळी ७ वाजता – गाव चावडी, बोरी पारधी
या ठिकाणी भव्य जयंती सोहळा पार पडणार आहे.
यामध्ये एकपात्री प्रयोगातून –
महात्मा फुले, संत गाडगेबाबा, लहुजी वस्ताद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला जाणार आहे.एकपात्री प्रयोगासाठी थेट नटसम्राट कुमार आहेर येणार आहेत
हा फक्त कार्यक्रम नाही…
ही आपल्या इतिहासाला, आपल्या मातीला आणि आपल्या महापुरुषांना वंदन करण्याची संधी आहे!
कारण इतिहास समजला, तरच भविष्य घडतं!
चला, या प्रेरणादायी सोहळ्याचे साक्षीदार बनूया…
आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना सांगूया –
आपला इतिहास अजूनही जिवंत आहे!



