आरोग्याचे उत्तम काम करणाऱ्या साठी भक्तांनी तालुक्यात गुढ्या उभारल्या पाहिजे….शिवाजी काळे

आवाज लोकशाहीचा
दौंड:प्रतिनिधी

आरोग्याच्या निधीतून ४५ हजार नागरिकांवर उपचार केले गेले १५०० नागरिक यमदूताच्या तावडीतून बाहेर आणलेले आहेत हे आता सांगण्या सारखे नसून रुग्णांच्या नातेवाईकांनी व  आरोग्यदूत यांच्या समर्थकांनी तालुक्यात घुड्या उभारायला पाहिजे होत्या अश्या स्वरूपाची माहिती जेष्ठ कामगार नेते शिवाजीराव काळे यांनी तालुक्यातील रुग्णसेवेची आकडेवारी समजल्याने केली आहे..

तालुक्यात आकडेवारी पाहिल्यावर खरच समाधान वाटले आहे.तालुक्यात सगळीकडे आनंदी-आनंद आहे.कोणाचीच लोकप्रतिनिधी बाबत तक्रार नाही,नागरिकांना सुगीचे दिवस आहेत.अपवाद रुग्णाची आकडेवारी होती.आम्ही सेवा निवृत्त कामगार सोडल्यास तालुक्यात सर्वत्र यांच्या मार्गदर्शनाखाली आबादी आबाद आहे…

तालुक्यात एकून मतदारांच्या संख्येत या रुग्णांचा आकडा पाहिल्यास एक चतुर्थअंश लोक हे विविध आजाराचे बळी होते बाकी तालुक्यात कोणालाही कसलाच त्रास झालेला नाही.या कामाचं कौतुक होणे तितकेच गरजेचे आहे
.विरोध फक्त आम्हीच करतोय.ही बाब अत्यंत चुकीची आहे.असे मला पण वाटते मात्र आमचे ४० कोटी  अधिक रुपयांची देणी या दूताने द्यावेत आम्ही त्याच्यासाठी स्व:वाद्य मिरवणुकीचा विचार करू

जमल्यास हत्तीवरून मिरवणूक काढण्यासाठी सुधा प्रयत्नशील राहू मात्र या मिरवणुकीसाठी माझे सहकारी सेवानिवृत्त यमा घरी गेलेले ५५  सहकाऱ्यांचा विचार घेता येणार नाही ही दुर्दैवाची बाब आमच्यासाठी आहे

या सहकाऱ्यांच्या घरात आज वृद्ध पत्नी लग्नाला आलेल्या मुली,आर्थिक संकटांनानी शाळा सुटलेली तरुण मुले याची अडचण सुद्धा आम्हाला या विचारापासून परावृत्त करू शकते.
४५ हजार रुग्णांचा उपचार करणाऱ्या या दूताला या कुटुंबातील एकाही व्यक्तीला भेटण्याचा योग आला नाही.त्याची साधी विचारपूस करता आलेली नाही  मात्र त्याने तालुका सोडून बाहेरील रुग्णांना दिलासा दिलेला आहे ही बाब आमच्या साठी  बरोबर आहे का?
गेले आठ-दहा वर्ष त्यांच्या कष्टाच्या घामाच्या पैशाच्या संदर्भामध्ये  देणी मिळालेली नसल्याने  मिरवणुकीच्या विचाराची आमच्यासाठी अडचण होऊ शकते

ज्या घरामध्ये आरोग्यासाठी मदत केली त्या सर्व रुग्णांचा नातेवाईकांचा खऱ्या अर्थाने आम्ही सुद्धा आदर करतो ज्यांनी त्यांना मदत केली असेल त्या मदतीसाठी त्यांचे हत्तीवरून मिरवणूक काढण्यासाठी आमची इच्छा आहे

मात्र आमच्या ५५  कार्यकर्त्यांची घर याच दुताच्या गलथान कारभाराने  अडचणीत आल्याने    मयत झालेल्या कामगारांची कुटुंबे खचलेली आहेत, हे दुःख सुद्धा जाहीर रीत्या सांगावी लागत आहेत ही बाबा खऱ्या अर्थाने या दुताच्या कार्याला दोष देत असल्याने आम्ही हतबल होत आहोत.

कोणी-कुणाचा उद्धार करावा कोणी कोणासाठी किती लाचार व्हावे कुणी खाल्लेले अन्नाला जागून कोणती भूमिका बजावावी  वेळोवेळी प्रसंगा-नुसार सर्वांनीच केल्या पाहिजेत याची जबाबदारी आमच्यावर सुद्धा आहे मात्र आमची तेवढी देणी मिळाली ना आम्ही सुद्धा तुमच्याकडून राहिलेल्या आनंद उत्सवाच्या गुढ्या उभारण्याच काम नक्की करू, अशा स्वरूपाचे इच्छा सुद्धा  या निमित्ताने काळे यांनी व्यक्त केली आहे


रुग्णांची सेवा हीच ईश्वराची सेवा हे ब्रीदवाक्य सर्वश्रुत असल्यातरी आम्ही घाम गाळून सेवानिवृत्त झालेल्या  कामगारांच्या घामाचे पैसे,आम्हाला मिळाले नाही तर रुग्णसेवा करून सुध्दा  कौतुकाचा ढोल काहीं कामाचा नाही असे आम्ही म्हणणारच .आमची देणी मिळवण्यासाठी वेळ आल्यास आता आम्हाला प्रहार करावा लागणार आहे

त्यांनी जाणून बूजन  केलेल पाप आहे.हे त्यांच्या त्या आरोग्याच्या सेवेसाठी आमच्या तळमळीने त्यांना  कधीही माफ होणारे नाही
हातात असताना त्यांनी ते केल नाही जे सरकारकडून आणून लोकांना दिले त्याचा मात्र  डिंडोरा पिटण्याचे काम करण्यासाठी भक्तांना कामाला लावलेले आहे

आम्ही अजून मुद्दामून सांगू इच्छितो त्यांच्या  कार्याचा उदो-उदो करायला सुद्धा तयार आहोत मात्र त्यांनी एकच काम करावं आमच्या घामाचा दाम आम्हाला द्यावा अशी इच्छा  काळे यांनी व्यक्त करीत आहेत

शेवटी म्हणाले आमची देणी द्या  रुग्ण-सेवेच्या कार्याबाबत खरतर तालुक्यात गुढ्याउभारल्या पाहिजे होत्या त्या उभारल्या गेल्या नाहीत आम्ही मात्र देणे मिळल्यावर त्या आमच्या घरी तरी नक्की उभारू अशा स्वरूपाची खोचक टीका अखेरच्या क्षणी त्यांनी आरोग्यदूत व  आरोग्य सेवा या विषयाकडे पाहून केलेली आहे..