आवाज लोकशाहीचा | विजय चव्हाण
दौंड :
सामाजिक बांधिलकी, समता आणि मानवतेचा संदेश जपणाऱ्या भीम कन्या ग्रुपने यंदाही बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या त्रिसूत्री निमित्ताने प्रेरणादायी उपक्रमांची मालिका राबवून समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे.
महाबोधी प्रबोधन संघ, दौंड येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त खीरदानाचा उपक्रम उत्साहात पार पडला. “दान हेच खरे धर्माचे सौंदर्य” या विचारांना उजाळा देत विविध ठिकाणीही खीरदान करण्यात आले आहे. जिथे जिथे बुद्ध पौर्णिमेचे कार्यक्रम पार पडले, तिथे तिथे भीम कन्या ग्रुपच्या सदस्यांची सक्रिय उपस्थिती समाजाला सकारात्मक उर्जा देणारी ठरली आहे.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा तर्फे आयोजित “धम्म पहाट” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते, या उपक्रमातही भीम कन्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. गौतम बुद्ध यांच्या करुणा, मैत्री आणि समतेच्या विचारांचा जागर समाजात पेरण्याचे कार्य या उपक्रमातून झाले.
“जिथे करुणा, तिथेच खरा विजय; जिथे समता, तिथेच खरा समाज” या विचारांची प्रचिती या उपक्रमातून आली.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त, ज्योतीताई मोकळ यांच्या ‘स्नेहज्योत’ वृद्धाश्रमाला भेट देऊन भीम कन्यांनी मदतीचा हात पुढे केला. “माणुसकीची ऊब देणे हीच खरी सेवा” या भावनेतून केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या सर्व उपक्रमांचे नेतृत्व संस्थापक अध्यक्षा रोहिणीताई ढवळे यांनी केले. त्यांनी सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानले. यामध्ये माजी नगरसेविका उल्का ताई कांबळे, अद्विका फाउंडेशनच्या अध्यक्षा नीना ताई जोसेफ, ग्राहक फाउंडेशन पुणे जिल्हा अध्यक्षा सविता ताई सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या जयश्री ताई माने, आरपीआय अध्यक्षा आशाताई मोहिते, पोलीस पाटील नीता ताई वाघमारे तसेच माधुरी ढवळे, अंजली चंदनशिवे, योगिता रणशृंगारे, शामल आढाव, मीरा जानराव, टीना बेंगळे, करुणा शिंदे, राधा कोडाची, चंदा रसाळ आणि सर्व भीम कन्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
“सेवेचा दीप प्रज्वलित ठेवणारे हात कधीही थकत नाहीत”
“समाजासाठी झटणाऱ्यांच्या पावलांनाच इतिहास सलाम करतो”
भीम कन्या ग्रुपचा हा उपक्रम केवळ कार्यक्रम न राहता समाजात जागरूकतेची आणि माणुसकीची नवी पहाट घडवणारा ठरला आहे.



