महापुरुषांच्या विचारांच्या समानार्थ आम्ही मैदानात उतरलो” या भूमिकेतून प्रबोधनात्मक संमेलनाचे आयोजन !

   …………………    दौंड मध्ये प्रथमच ………………..


आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण…
दौंडमध्ये प्रथमच “महापुरुषांच्या विचारांच्या समानार्थ आम्ही मैदानात उतरलो” या भूमिकेतून प्रबोधनात्मक संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, येत्या रविवार दि. २६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत हे संमेलन मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
हे संमेलन दौंड पोलीस स्टेशन समोरील नीलक्रांती मैदान, प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील हुतात्मा चौक ते संविधान चौक मार्गावर आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी बामसेचे जिल्हाध्यक्ष सुमित सुनील साबळे राहणार आहेत.
कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून पांडुरंग मेरगळ, विनोद जगताप, सोहेल खान, प्रशांत खामकर (घारगाव) हे उपस्थित राहून विविध सामाजिक, ऐतिहासिक आणि परिवर्तनवादी विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, दौंड नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे, उपनगराध्यक्ष छायाताई थोरात, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पोळ, आरपीआय अध्यक्ष रवी कांबळे, राष्ट्रवादी (अजित पवार गट) अध्यक्ष नारायण ग्रुप, भारत मुक्ती मोर्चा महिला संघ जिल्हाध्यक्ष सविता सोनवणे, जिल्हाध्यक्ष किशोर तुपारे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश जगदाळे, आम आदमी पक्ष अध्यक्ष रवींद्र जाधव यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
तसेच सामाजिक कार्यकर्ते भीमराव मोरे, राजेश पाटील, स्वप्निल शहा, आबा वाघमारे, सुशील अहिवळे, राजश्री धेंडे, तसेच तहसीलदार बापूसाहेब कनवाळू, भोसले, अमोल काळे आदी मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित संदेश विशेषत्वाने मांडला जाणार आहे. “माझा जयजयकार करण्यापेक्षा मी हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी प्राणाची बाजी लावा” या त्यांच्या १७ ऑगस्ट १९५२ रोजी मुंबई येथे व्यक्त केलेल्या विचारांचा संदर्भ देत समाजाला कृतीशील बनण्याचे आवाहन केले जाणार आहे.
यासोबतच “कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभे केलेले रयतेचे राज्य आणि आजचे वास्तव”, “मूलनिवासी महापुरुषांच्या आंदोलनात मुस्लिम बांधवांचे योगदान”, तसेच “सत्यशोधक समाजाचे पुनर्जीवन हेच व्यवस्था परिवर्तनाचे पहिले पाऊल” या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चिंतन होणार आहे.
सध्याच्या काळात समाजात वाढत चाललेल्या तणावपूर्ण वातावरणाचा, जातीय संघर्षाचा आणि सामाजिक तिढ्यांचा गांभीर्याने विचार करून समाजात शांतता, बंधुता आणि जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने या प्रबोधनात्मक संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष संजीव आढाव, उपाध्यक्ष मिलिंद थोरात, दौंड शहराध्यक्ष चंद्रशेन गालफाडे, राष्ट्रीय परिवर्तन तालुकाध्यक्ष राहुल चव्हाण, कार्याध्यक्ष सज्जन दिवार, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुकाध्यक्ष बीड गायकवाड, कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, उपाध्यक्ष किसन वाघमारे, संघटक राहुल आढाव, महिला अध्यक्ष रमिला कातकडे, उपाध्यक्ष भारत नगरे, प्रभारी बहुजन पार्टी ॲड. प्रकाश लोंढे, संघटक बबन थोरात व शहराध्यक्ष राजू थोरात यांनी पुढाकार घेतला आहे.
समाज परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या प्रबोधनात्मक संमेलनास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.