आवाज लोकशाहीचा विशेष वृत्त
पुणे | शनिवार, ४ एप्रिल २०२६ —
पुरंदर हादरले: नीलम गायकवाड हत्या प्रकरणाने पोलीस-गुन्हेगार अभद्र युती उघड; आरोपीचे आत्मसमर्पण की ‘सेटिंग’?
खानवडी (प्रतिनिधी):
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडी परिसरात घडलेली २२ वर्षीय नीलम महेंद्र गायकवाड हिची हत्या ही केवळ एक गुन्हेगारी घटना नसून पोलीस व्यवस्थेच्या अपयशाची आणि संगनमताची काळी बाजू उघड करणारी धक्कादायक घटना ठरत आहे. माळशिरस येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणारी नीलम गायकवाड हिचा खून अनिकेत विष्णू जाधव याने केल्याची फिर्याद तिचे वडील महेंद्र गायकवाड यांनी दिली आहे. आरोपी स्वतःहून पोलिसात हजर झाला असला तरी हे आत्मसमर्पण नसून सेटिंगचा भाग तर नाही ना? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
“गुन्हेगारीचा उद्योग” खाकीच्या आशीर्वादाशिवाय शक्य?
फिर्यादी आणि स्थानिकांच्या माहितीनुसार, आरोपीच्या कुटुंबाचा जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील राजुरी, माळशिरस, नायगाव, पोंढे परिसरात अनेक वर्षांपासून गांजा विक्रीचा उघड व्यवसाय सुरू होता. याच अवैध धंद्यातून:
मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर संपत्ती जमा केली गेली.
आलिशान बंगल्यांसह शेतजमिनींची खरेदी झाली.
परमिट रूम, बिअर बार आणि लॉजिंग व्यवसायांचे साम्राज्य उभे राहिले.
हे सर्व पोलिसांच्या डोळ्यादेखत होत असताना कोणतीही कारवाई का झाली नाही? कायद्याची भीती नसलेला हा व्यवसाय “आशीर्वादाशिवाय” चालू शकतो का? असा थेट प्रश्न आता जनतेतून विचारला जात आहे.
क्रूर कृत्य: महाविद्यालयीन तरुणीचा निर्घृण खून.
अवैध धंदे: गांजा विक्रीतून उभे केले आर्थिक साम्राज्य.यावर पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधणार का?असा प्रश्न यातून निर्माण होतो आहे ?याचा विपरित परिणाम झाला आणि
माळशिरस गावात कडकडीत बंद पाळला,
अनिकेत जाधववर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. यवत पोलीस ठाण्यातही त्याच्या गुन्ह्यांची नोंद आहे. अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीवर वेळेत कठोर कारवाई का झाली नाही? त्याला मोकळे रान देणारे सूत्रधार कोण? स्थानिकांचा आरोप स्पष्ट आहे की, गुन्हेगार जन्माला येत नाही, तो पोलिसांच्या दुर्लक्षातून आणि संगनमतातून तयार होतो.हे प्रश्न नागरिकांना वादळी विषय झाले आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याशी निगडित खानवडी परिसर, जो शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक मानला जातो, तोच परिसर आता हत्या आणि गुन्हेगारीमुळे बदनाम होत आहे. ही बाब केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशावर बोट ठेवणारी आहे.
पोलीस यंत्रणेकडून विविध तर्क-वितर्क मांडले जात असले तरी मूळ प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत:
गांजा विक्रीचे जाळे कोणाच्या संरक्षणाखाली चालत होते?
बेकायदेशीर व्यवसायांना अभय कोणी दिले?
वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपीला वेळीच बेड्या का ठोकल्या नाहीत?
नीलम गायकवाड हिचा मृत्यू हा केवळ एका विकृत तरुणाच्या हातून झालेला गुन्हा नाही, तर तो पोलिसांच्या निष्क्रियतेचा आणि भ्रष्ट व्यवस्थेचा थेट परिणाम आहे. जोपर्यंत या गुन्हेगारांना “आशीर्वाद” देणारे हात उघडे पडत नाहीत, तोपर्यंत अशा निष्पाप मुली बळी जात राहतील.



