आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण
वर्दीतील अहंकार की व्यवस्थेचा माज?
दौंड पोलीस ठाण्यातील एका घटनेने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत एकाची चूक अनेकांसाठी बदनामी ठरते हे त्याच्या लक्षात कसे येत नाही
वर्दी माणसाला जबाबदार बनवते की उद्धट? अलीकडच्या काळात हा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. कारण, वर्दीतील माणसाला जे बोलायचं असतं ते तो अनेकदा बोलत नाही—आणि जे बोलू नये ते मात्र ठणकावून बोलतो.
दौंड पोलीस ठाणे येथे घडलेला एक प्रसंग याच मानसिकतेचं जिवंत उदाहरण ठरतो.
नावाची पाटी वाचली… आणि संतुलन ढासळलं
पोलीस वर्दीवरील नावाची पाटी ही ओळख असते, गुन्हा नव्हे. मात्र ती ओळख वाचली म्हणून “मला ब्लॅकमेल करता का?” असा उर्मट सवाल एका पोलीस कर्मचाऱ्याने थेट प्रसारमाध्यम प्रतिनिधींना विचारला.
प्रश्न साधा होता—“जखमींची सद्यस्थिती काय आहे?”
पण उत्तराऐवजी मिळाला दम, आक्रस्ताळेपणा आणि अहंकाराचा उद्रेक.
घटना गंभीर – पण माहिती ‘गुप्त’ का?
७ जानेवारी रोजी दौंड–पाटस रोडवरील ‘जगदंबा’ हॉटेलमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.
या अपघातात ९ जण जखमी, त्यापैकी ६ जणांची प्रकृती चिंताजनक होती.
७ ते १५ जानेवारीदरम्यान जखमींची स्थिती जाणून घेण्यासाठी तपास अधिकारी व तक्रारदार पोलीस कर्मचाऱ्यांकडे वारंवार विचारणा झाली—
मात्र माहिती मिळालीच नाही.
उलट, संबंधित विभागाची खोली सतत कुलूपबंद. अधिकारी सापडत नाहीत.अशी अवस्था होती
अशा परिस्थितीत प्रसारमाध्यमांनी विचारणा करणे हा गुन्हा ठरतो का?
“कुठल्या कायद्यात लिहिलंय माहिती द्यावी?”
ही वाक्यं वर्दीतल्या माणसाला शोभतात का?
तपास सुरू आहे हे मान्य—
पण जखमी जिवंत आहेत की दगावले?
हा प्रश्न तपासात अडथळा आणतो का?
“पाच दगावले आहेत, निघा”
असं बेफिकीर आणि असंवेदनशील उत्तर देणं म्हणजे
वर्दीचा अपमान नाही का?
‘खलनिग्रणाय शतरक्षणाय’ कुणासाठी?
पोलीस दलाचं ब्रीदवाक्य—
दुर्जनांना भीती, सज्जनांना संरक्षण.
पण सध्या चित्र उलटं वाटतंय का?
प्रश्न विचारणाऱ्यांवर चिडचिड
माहिती मागणाऱ्यांना दम
ओळख वाचली म्हणून “ब्लॅकमेल”चा आरोप
हे सगळं व्यवस्थेच्या भीतीतून की अहंकारातून?
वर्दी कायद्याची आहे, माजाची नाही असा प्रश्न या निमित्त नागरिकांना टीकेला कारण बनतो आहे
हा प्रकार एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित नसून
तो पोलीस कारभाराच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभं करतो.
प्रसारमाध्यमे अडथळा नाहीत हे यंत्रणेने लक्षात घेतले पाहिजे
ती लोकशाहीची डोळे आणि कान आहेत. यांच्या डोळ्यात आणि कानात धूळफेक करण्याची हिंमत अशा मित्रांकडून होते आणि बदनाम होतोय तो बाकीचा पोलिस बांधव



