आमदार राहुल कुल यांच्या गावात पिण्याच्या पाण्यासह विकास कामाच्यासाठी झाले.आक्रोश आंदोलन?

आवाज लोकशाहीचा ..विजय चव्हाण ….

राहू हे आमदार राहुल कुल यांचे गाव – पण पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना आजही बाजारातून कॅन घ्यावे लागतात!
हीच वस्तुस्थिती राहू चौकात झालेल्या जाहीर आक्रोशातून उघड झाली आहे.
गेली जवळपास २५ वर्षे कुल कुटुंबाकडे आमदारकीची सत्ता असताना त्यांच्या स्वतःच्या गावालाच पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी नळयोजना देता आलेली नाही, ही केवळ अपयशाची नाही तर राजकीय सामाजिक आस नसलेली कबुली आहे. गटारी, अंतर्गत रस्ते, स्वच्छता – या सगळ्या बाबतीत राहू गावाची अवस्था राजधानी म्हणवणाऱ्या गावाला शोभणारी नाही, हे या आंदोलनाने स्पष्ट केले.
चौकात काही मोजके नागरिक उभे राहिले, ही संख्या कमी असू शकते

राहू गावात चौकात ग्रामस्थांचा विकास कामांच्या बाबत आक्रोश


पण त्यांच्या मागे उभा असलेला असंतोष प्रचंड आहे.
राजकीय दडपशाहीमुळे अनेकांनी उघडपणे येणे टाळले, पण “पाणी आम्हाला विकत घ्यावे लागते” हा सत्य कोणीही नाकारू शकत नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून “काम प्रगतीपथावर आहे”, “लवकरच योजना पूर्ण होईल” अशी आश्वासनांची भेंडोळी गावकऱ्यांच्या गळ्यात अडकवली गेली.
प्रत्यक्षात मात्र जलजीवन मिशन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च झाले – पण नळाला पाणी नाही.
जर आमदारांच्या स्वतःच्या गावाची ही अवस्था असेल,
तर दौंड तालुक्यातील इतर गावांचे काय हाल असतील?
हा प्रश्न आता राजकीय नव्हे तर मानवी बनला आहे.
भक्तांसाठी जाहिरातींचा विकास,
आणि सामान्य माणसासाठी कोरड्या नळातून वाहणारे खोटे आश्वासन –
हाच आज राहू गावाचा आणि दौंड तालुक्याचा वास्तव चेहरा आहे.
या आक्रोशामुळे एक गोष्ट मात्र ठळक झाली आहे –
कुल परिवाराच्या “विकासाच्या कथा” गावातच कोसळल्या आहेत.
आणि त्या ढिगाऱ्याखाली दबले आहे –
ग्रामस्थांचे पिण्याचे पाणी. 💧

संख्येने कमी असलेले मात्र धाडसाने विकास कामांच्या साठी आवाज उठवणारे राहू गावचे नागरिक