दौंड प्रभाग ९ मध्ये उमेदवार खरेदीची चर्चा; ३० लाखांच्या ऑफरची खळबळ

नॉन पॉलिटिकल स्वतःला समजणाऱ्या राजकीय दलाल या प्रकरणी उघड?

आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण ……दौंड निवडणूक विशेष वृत्त…..

दौंड नगरपरिषदेच्या निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ९ मधील एका जागेच्या निवडणुकीत उमेदवार खरेदीसाठी तब्बल ३० लाख अधिक रुपयांची ऑफर देण्यात आल्याची चर्चा शहरात सुरू असून त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वतःला नॉन पॉलिटिकल व्यक्ती म्हणून ओळख देणाऱ्या एका व्यक्तीने मध्यस्थी करत, एका उमेदवाराला माघार घेण्याच्या बदल्यात पंचायत समितीचे तिकीट देण्याचे आणि निवडून आणण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा आहे. संबंधित उमेदवाराने “आम्ही नगरपालिकेचे मतदार आहोत, पंचायत समितीत उभे राहू शकत नाही” असे स्पष्ट केल्यानंतरही, तलाठ्याच्या माध्यमातून नावे बदलता येतील असा दावा करण्यात आल्याचेही बोलले जात आहे.

हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून घडला, या कथित मध्यस्थामागे कोणाचा पाठिंबा होता आणि नेमकी कोणती बाजू अस्वस्थ आहे, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले असून ज्यांनी ऑफरला धुडकावले त्यांची प्रामाणिक पणाच्या चर्चेची मोठी वाह वाह सुरू झाली आहे .

निवडणुकीत लोकशाहीच्या मार्गातून तोकडे असणारे आणिपैसे वाटप करून मतदार विकत घेणाऱ्या या प्रकरणाने चांगलीच चपराक बसली असून  ऑफर धुडकावणाऱ्या त्या उमेदवाराबाबत मतदारांमध्ये मोठी इज्जत निर्माण झालेली आहे

पैशाच्या जोरावर राजकारणात उतरलेल्याची मस्ती या निमित्त उघड पडलेली असून प्रक्षलोभला बळी नपडणारे आणि नागरिकांच्या विश्वास पात्र ठरणारे उमेदवार. सुद्धा आहेत हे सिद्ध करणारा उमेदवार या निमित मतदारांना  दिसून आला आहे .

दरम्यान, प्रभाग क्रमांक ९ मधील अनुसूचित जाती महिला (अ वर्ग) राखीव जागेची निवडणूक न्यायालयीन आदेशामुळे पुढे ढकलण्यात आली असून दि. २० रोजी मतदान होणार आहे. या जागेसाठी शरद पवार गटाच्या ॲड. शीतल मोरे, अजित पवार गटाच्या शुभांगी घुले आणि नागरी हित संरक्षणच्या रेणुका थोरात या तीन उमेदवार रिंगणात आहेत. सुमारे ३,९०० मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.

सूत्रांनुसार, उमेदवार खरेदीची कथित ऑफर संबंधित उमेदवाराने नाकारली असून, या चर्चेमुळे निवडणुकीतील वातावरण अधिक तापले आहे.

निवडणुका लोकशाही पद्धतीने पार पडाव्यात, ही अपेक्षा असताना मतदान अथवा उमेदवार खरेदी-विक्रीच्या चर्चा सातत्याने पुढे येणे ही चिंतेची बाब मानली जात आहे. अशा प्रकारांमुळे निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


…………………..संपादकीय वृत्त……………………

निवडणूक ही लोकशाहीची आत्मा आहे. मात्र दौंडमधील प्रभाग क्रमांक ९ च्या निवडणुकीभोवती फिरणाऱ्या उमेदवार खरेदीच्या चर्चांनी ही आत्माच अस्वस्थ केली आहे. मतदारांची खरेदी ही दुर्दैवी वास्तव बनत असतानाच, थेट उमेदवार माघार घेण्यासाठी पैशाची बोली लावली जात असल्याची चर्चा ही अधिकच गंभीर बाब आहे.

अशा प्रकारांमुळे निवडणूक प्रक्रिया केवळ संशयाच्या भोवऱ्यात सापडत नाही, तर सामान्य मतदारांचा लोकशाहीवरील विश्वासही ढासळतो. प्रशासन, निवडणूक यंत्रणा आणि संबंधित राजकीय पक्षांनी याची गांभीर्याने दखल घेऊन पारदर्शक चौकशी करणे आवश्यक आहे. दोषी कोण असो, लोकशाहीची किंमत ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही.

निवडणूक ही लोकशाहीची आत्मा आहे. मात्र दौंडमधील प्रभाग क्रमांक ९ च्या निवडणुकीभोवती फिरणाऱ्या उमेदवार खरेदीच्या चर्चांनी ही आत्माच अस्वस्थ केली आहे. मतदारांची खरेदी ही दुर्दैवी वास्तव बनत असतानाच, थेट उमेदवार माघार घेण्यासाठी पैशाची बोली लावली जात असल्याची चर्चा ही अधिकच गंभीर बाब आहे.