दौंड:आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:- विजय चव्हाण
पुनर्वसन (प्रकल्पग्रस्त) नावाखाली सरकारी जमिनी बळकावल्या ,आणि बेकायदेशीर लाभार्थी बनले असतील तर ही बाब गंभीर आहे अशा स्वरूपाची चिंता उच्च न्यायालयाने व्यक्त केली असल्याने.पुनर्वसन जमिनी घोटाळा झाल्याचे निश्चित संकेत समोर आले आहेत.उच्च न्यायालय पीटिशन क्र २०१ ऑफ २०२३ या मध्ये याबाबत स्पष्ट मत नोंदवण्यात आलेले असून सरकारने त्या बाबत चौकशी करणे आवश्यक आहे असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
या प्रकरणात जमिनी वाटप करताना अधिकृत यंत्रणेचा पूर्णपणे गैरवापर होत असून यामध्ये प्रत्यक्षात मालमत्ता एजंट या प्रकरणांमध्ये गुंतलेले आहेत असे याचिकाकर्त्यांनी निदर्शनास आणून दिलेले आहे असे न्यायालयांनी नमूद केलेले असल्याने प्रकल्पग्रस्तांसाठी लाभदायक कायद्याचा अशा प्रकारे गैरवापर करता येणार नाही हा मुद्दा मोठा असल्याने आम्ही राज्य सरकारच्या सर्वोच्च अधिकाऱ्याला म्हणजे संबंधित विभागाचे प्रधान सचिव यांना या समस्येकडे लक्ष द्यावे आणि यंत्रणेला योग्य ते आदेश द्यावेत असे नमूद केले आहे .एकंदरीत पुनर्वसन विभागात मोठा घोटाळा जमीन वाटप प्रकरणी झालेला आहे असे न्यायालयांच्या नोंदी पाहता दिसून येत आहे .
तालुक्यात अशा बोगस जमिनी मिळवण्यात आलेल्या असून या जमिनी मिळवणाऱ्या दोन तीन टोळ्या कार्यरत आहेत.
यातील मोठे एजंट राजकीय आशीर्वादाने काम करीत असून त्यांना मोठ्या राजकीय अकाचे पाठबळ मिळाल्याने त्यांनी अनेक गोरगरीब पुनर्वसन नागरिकांच्या जमिनी खोटी कागदपत्रांच्या आधार घेऊन बोगस कागदपत्रे करून मूळ खातेदारांच्या जागेवर भलताच लाभार्थी दाखवून जमिनी लाटल्या विकल्या आहेत.दौंड शहर,केडगाव,दापोडी,यवत,नानगाव,कानगाव,पाटस, सोनवडी,गोपाळवाडी,लिंगाळी, या भागातून मोठ्या प्रमाणात दलाल यासाठी कामे करीत आहेत .
शासनाने सरकार जमा केलेली जमीन काय झाली .पुरंदर दौंड प्रांत यांनी बोगस लाभार्थ्यांची मोठी यादी तयार केलेली होती २०१४ ते २०१६ दरम्यान जवळपास अडीच हजार एकर जमीन सरकार शिका मारून यादी केली होती.सध्या ही जमीन कोणाच्या ताब्यात आहे हा प्रश्न मोठ्या आहे.
अनेकांनी जमिनीवर शिक्का बसल्यावर तिची विक्री केल्याचे संकेत आहेत सरकार शिक्कामोर्तब जमिनी कोणी विकल्या त्यांना विक्री परवानगी कशी मिळाली हे सर्व गौड बंगाल काय आहे याचाही शोध घेणे काळाची गरज आहे या सर्व प्रक्रियेमध्ये दलाल एजंटांबरोबर ते सरकारी अधिकारी मोठ्या प्रमाणात गुंतलेले आहेत अशा स्वरूपाची शंका उपस्थित होते.



