आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण…
दौंड तालुक्यातील खोर (केसकर वस्,ती) येथील 23 वर्षीय रंजना केसकर या तरुण मातेचा कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाला… पण या मृत्यू मागचं वास्तव जितकं भयानक आहे, तितकंच संशयास्पदही! वाटत आहे
दोन वर्षांची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा… एवढ्या लहान लेकरांना आईपासून कायमचं वंचित करून गेलेली ही घटना, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आणि आरोग्य व्यवस्थेतील गोंधळाचा जिवंत पुरावा ठरत आहे.
केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाच दिवशी 20 पेक्षा अधिक महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचा प्रयोग म्हणजे येथील कार्यक्रमाली म्हणजे प्रयोग शाळाच म्हणावी का? काळजी पेक्षा प्रयोग जास्त केला जातो असल्याचे दिसून येते
त्यासाठी बोलावण्यात आलेला फलटण तालुक्यातील वादग्रस्त.डॉक्टर येतात त्यांची पुणे जिल्ह्यात नेमणूक करण्यात आले असल्याने ही बाब मोठी गंभीर म्हणावी ?
शस्त्रक्रिया केल्या नंतर रुग्णाची प्रकृती बिघडत असताना दुर्लक्ष करण्यात आलेले आहे आणि प्रकृती गंभीर होई पर्यंत दुर्लक्ष केले गेले ही वस्तुनिष्ठ परिस्थिती होती.
परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर घाईगडबडीत हलवण्याचा निर्णय
हा सर्व प्रकार “आरोग्य सेवा” पेक्षा “बेजबाबदार प्रयोग” वाटावा असा आहे.
वेळ गेला… आणि जीवही!
केडगाव ते वरवंड – आणि तिथून पुढे पुणे…
या दरम्यानचा प्रत्येक मिनिट महत्त्वाचा होता.
पण काय झालं?
खाजगी रुग्णालयात ऍडमिट करण्यासाठी आधी पैसे
उपचार सुरू होण्याआधी आर्थिक व्यवहार
ॲम्बुलन्स साठीही कुटुंबा कडूनच पैसे
ज्यांच्या घरात दुःखाचं वादळ आलंय, त्यांच्याकडूनच पैशांची वसुली…
हा प्रकार आरोग्य व्यवस्थेचा काळा चेहरा उघड करतो.
प्रशासन सक्रिय… पण नेमकं कशासाठी?
या घटनेनंतर प्रशासन हललं…
पण न्यायासाठी नव्हे, तर प्रकरण दाबण्यासाठी, असा आरोप जोर धरतोय.
अद्याप पोलिसांत स्पष्ट नोंद नाही
तरीही शस्त्रक्रिया करणारेडॉक्टर यवत पोलिसांना भेटून आले?
चौकशी समिती नेमली… पण निकालाचा इतिहास शून्य!
ही चौकशी खरंच सत्य बाहेर आणणार की आणखी एक “फाईल बंद” प्रकरण ठरणार?
वादग्रस्त डॉक्टरवर प्रश्नचिन्ह
पूर्वीही अनेक प्रकरणांची चर्चा
सरकारी नोकरी + खाजगी हॉस्पिटल
बदली न होण्यामागे नेमकं काय?
जिल्हा परिषदेनं अशा डॉक्टरवर विश्वास ठेवून शस्त्रक्रिया सोपवलीच कशी?
हा प्रश्न आता थेट प्रशासनाच्या गळ्यात अडकतोय.
माणुसकी हरवली का?
ही फक्त एक मृत्यूची बातमी नाही…
ही व्यवस्थेच्या अपयशाची, संवेदनशीलतेच्या मृत्यूची आणि गरीबांच्या असहायतेची कथा आहे.
दोन निरागस लेकरं आईशिवाय झाली…
आणि प्रशासन अजूनही कागदांमध्ये गुंतलेलं!
थेट सवाल!
दोषी डॉक्टरांवर गुन्हा दाखल होणार का?
मृत माईच्या कुटुंबाला न्याय आणि मदत कधी?
अशा शस्त्रक्रिया शिबिरांवर नियंत्रण कोण ठेवणार?
“आवाज लोकशाहीचा” विचारतो —
गरीबांच्या जीवाची किंमत इतकी स्वस्त झाली आहे का?




