दौंड शहरात माती चोरट्यांनी प्रशासनाला आव्हानच, माती बंद करून दाखवा नागरिकांपुढे बोलतात भाषा

आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण ….

दौंड शहरात माती चोरट्यांनी प्रशासनाला आव्हानच दिले असून बंदच करून दाखवा अशी स्वरूपाची भाषा ते बोलू लागले आहेत अशी माहिती नागरिकांकडून मिळाली आहे .
चोरट्या व्यवसायातून भरमसाठ पैसे मिळत असल्याने आणि त्यातून गावकामगार तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्या हातावर टेकू ठेवल्याने त्यांची खरी माहिती दौंड तहसील कार्यालयात पोहचत नाही ,परिणामी यंत्रांच्या साह्याने बेसुमार खोदाई करून शासनाच्या नियम अटी गाडून टाकून त्यावर पाय रोवून त्यांचा धंदा जोरावलेला आहे .
राजकीय आशीर्वाद पाठीशी असतोच म्हणून वेळ पडल्यास अधिकाऱ्यांना भीती दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यास ते मागे पुढे पाहत नाहीत,
सुरवातील परवानगी मिळवण्यासाठी गावकामगार तलाठी आणि मंडल अधिकारी यांची कागदपत्रे तयार करतानाचं आमच काय असा शब्दप्रयोग केला जातो आणि इथेच चालू होतो खेळ या खेळातच हातावर टेकवलेल्या टेकूने मंडल अधिकारी आणि तलाठी दोघेही यांच्या कागदपत्राचा बंदोबस्तव्य व्यवस्थित करतात त्यातून त्यांना महसूल प्रशासनाकडे परवानगी मिळते आणि मग अडीचशे रुपये ब्रासला देणाऱ्या मातीचा सरकारचा दर हे हजारो रुपये दराने विकतात ही विक्री करताना उत्खनन करण्यासाठी शासनाने ज्या नियमाने अटी घालून दिलेले आहेत त्या पायदळी सोडवतात याचा विपरीत परिणाम पर्यावरण हानी आणि नागरी जीवनावरती मोठा होतो यांच्याकडून उत्खनन केल्यानंतर माती भरणारे अवजड हायवा ज्या गावच्या रस्त्यावरून जातात त्या गावकऱ्यांना त्या हवा पासून भीती असते प्रचंड अनाठाई स्वरूपाने भरलेली ही माती ट्रक पुढे जाताना मागील वाहन चालकांच्या डोळ्याला त्रास करते यामुळे अपघातही घडतात या सगळ्या गोष्टीची जबाबदारी महसूल खात्यातील तलाठी आणि ग्रामसेवकांची यांनी स्वीकारली पाहिजे होती तसं घडत नाही आणि याचा विपरीत परिणाम हातावर टेकवलेल्या टेकू मुळे जनजीवन पर्यावरण या सगळ्याचा ऱ्हास होताना तस्कर मात्र बेफाम पण आपला धंदा करीत आहेत स्वरूपाचे या धंद्यातून मिळणाऱ्या पैशामुळे ते वास्तवले असून आमचं काहीच खुणे करू शकत नाही अशी भाषा आता ते बोलू लागले आहेत सर्वाधिक त्रास हा दौंड मधल्या चार ते पाच तस्करांचा असून त्यांनी पूर्व भागातील गावांमध्ये मोठा हैदोस घातलेला आहे या भागातील उत्खनन होणाऱ्या गावातील तलाठी आणि मंडल यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत अशा स्वरूपाची मागणी आता जोर धरू लागलेली आहे शेतात कुंपण खातंय मग आवरणारे तरी कोण अशा स्वरूपाची अवस्था या महसूल विभागाची झाल्याकारणाने तस्कर झाले बेफोर्म आणि प्रशासन मात्र गुडघे टेकतय अशी अवस्था या तालुक्यात माती तस्करांच्या वर्तनानामुळे वाढलेली आहे